Women's meet and turmeric program on the occasion of Wadner Savitribai Phule Jayanti.
Women's meet and turmeric program on the occasion of Wadner Savitribai Phule Jayanti.

वडनेर सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- तालुक्यातील ग्रा.पं.वडनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त तीळ संक्रांत व हळदीकुंकू क्या कार्यक्रमाचे आयोजन महिलांकडून करण्यात आले होते. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या जनक माता सावित्रीबाई फुले,माता रमाबाई आंबेडकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता जिजाबाई यांना फुलमाळा अर्पण करून जयघोष करण्यात आला.
उपस्थित महिलांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच सावित्रीबाई, माता रमाई क्या आशीर्वादाने आम्हाला ग्रा.पं. येथे कार्यक्रमाला उपस्थित राहता आले असे सांगितले.

एका स्त्रीने शिक्षण घेतले तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतो त्यास प्रमाणे संपूर्ण देश साक्षर होईल असाही निश्चय आजच्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केला. भविष्यात महिला अबला नसून सबला झाली पाहिजे, महिलांची उन्नती झाली पाहिजे महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे महिलांना संपूर्ण हक्क मिळाले पाहिजे, महिलांची कोणीही विटंबना करू नये, महिलांचे संघटन कोणीही तोडू नये असे ही विचार व्यक्त करून, स्त्री शक्तीच्या विजयी घोषणा देण्यात आल्या..
महिलांचे मनोबल वाढावे, आत्मविश्वास द्विगुणित व्हावा या करिता स्वागत गीत घेण्यात आले.

इतनी शक्ती हमे देना दाता |
मन का विश्वास कमजोर ना होना |

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वडनेर ग्रा.पं. च्या सरपंच सौ. कविताताई विनोद वानखेडे, उपस्थित ग्रा.पं. सदस्या सौ रीनाताई गजानन तागडे, सौ दिपाली राहुल भुते, सौ वनिता सुनील कळसकर, सौ वर्षाताई संजय भोयर तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई बबनराव आंबटकर, सौ संगीताताई कृष्णाजी महाजन, सौ सोनाली सुभाष शिंदे , महिला बचत गटाच्या सौ संगीताताई डोफे,सौ विद्या घोडमारे, सौ ढेंगरे ताई व अंगणवाडी सेविका आशा सेवा व गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार सौ निखत आरिफ शेख यांनी केले. सर्व महिलांनी सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here