नागभीड येथे लाँज मध्ये गैरप्रकार..?
चौकशी करण्याची नागरिकांची मागणी.

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधि
9403321731
नागभिड- नागभीड येथे अनेक ठिकाणी लाँज आहेत या लाज मध्ये अल्पवयीन शाळकरी मुले- मुली जात असून याबाबत संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे…
लाँज चे काही नियम आहेत हे नियम धाब्यावर बसवून अनेक दुष्कृत्य या ठिकाणी होत असल्याचे उघड पणे बोलले जात आहे.. नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असून ग्रामीण भागातील अनेक मुले या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात मात्र या लाँज मध्ये अधिकच पैसे देऊन सर्रासपणे प्रवेश दिला जात असल्याने अनेकजण याचा फायदा घेताना दिसत आहेत.
तसेच काही लाँज भर वस्तीत असल्याने या प्रकाराने लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे…याबाबत संबंधित प्रशासनाने लक्ष देत सदर सर्व लाँज ची तपासणी करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.ॽ