पतीनेच केला पत्नीवर भर रस्त्यात अॅसिड हल्ला

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूरमध्ये राहणाऱ्या एका पतीनेच आपल्या पत्नीवर भर रस्त्यात अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नागपुरातील रामेश्वरी परिसरामध्ये आज (22 जानेवारी) सकाळी एका व्यक्तीने सायकलवर जाणाऱ्या एका महिलेवर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता याप्रकरणी आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिलेवर हल्ला करणारा व्यक्ती हा महिलेचा पतीच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नागपुरातील रामेश्वरी परिसरातील दुचाकीवरुन येणाऱ्या एका व्यक्तीने सायकलने जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर ॲसिड फेकलं होतं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करुन आरोपी पाटील याला अटक केली होती.
पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होते आणि त्यातूनच पतीने हे कृत्य केलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपी पती हा प्लंबरचे काम करतो. त्यामुळे प्लंबिंगच्या कामामध्ये वापरले जाणारे अॅसिडसारखे द्रव त्याने या हल्ल्यात वापरले असल्याचं आता समोर आलं आहे. सतत होणाऱ्या वादामुळे पती आणि पत्नी हे वेगळे राहत होते. मात्र, पत्नीला कायमची अद्दल घडविण्यासाठी पतीने थेट तिच्या तोंडावर अॅसिड फेकलं.
आज (22 जानेवारी) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधात विविध पथक रवाना केले आणि आरोपी पतीला अटक केली. महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते आहे.
दरम्यान, भरदिवसा करण्यात आलेल्या अॅसिड हल्ल्याने नागपुरातील रामेश्वरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या असून आता त्यांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहेनागपूरमध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच स्वत: आयुक्तांनी याप्रकरणाची दखल घेत संबंधित आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार केली. ज्यामुळ आरोपी अवघ्या काही तासात पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सध्या पोलीस या हल्ल्याप्रकरणी त्याची कसून चौकशी करत आहे