दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान समीतीची कोटगांवला भेट

50

दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान समीतीची कोटगांवला भेट

दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान समीतीची कोटगांवला भेट

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड : – तालुक्यातील कोटगांव येथे पं.दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान समीतीने कोटगांव ग्रा.प.ला आज भेट दिली. या समीतीमध्ये जि.प.हिंगोलीचे उपकार्यपालन अधीकारी राठोड साहेब, उपकार्यपालन अधीकारी कलोडे साहेब जि.प. चंद्रपुर , भोजे साहेब वि.अ. हिंगोली, पठाण साहेब संगणक परीचालक हिंगोली ,प्रणाली खोचरे बिडीओ उपस्थित होते. पं.दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियाना अंतर्गत सन २०२०-२१ चे तपासनी साठी ही टीम आली होती. या मध्ये ग्रामसभा,महीला सभा, गावातील नाविण्यपुर्ण उपक्रम, शासनाच्या विविध योजना,पंचायतीचा लेखाजोखा तपासणी करुन अनेक मुद्यावर चर्चा करण्यात आली. कोटगांव येथील ग्रामपंचायत नविन नविन उपक्रम राबवित असते. ही ग्रामपंचायत अनेक पुरस्कारांनी सन्मानीत आहे. अनेक कामे हे लोकसहभागातुन केल्या जातात. तालुक्यात स्मार्ट ग्राम म्हणून नाव लौकीक आहे. यावेळी प्रास्ताविक ग्रामसेविका ढोरे मँडम यांनी केले. तर संचालन उइके मँडम यांनी केले.