महाराष्ट्र विधवा महिलेवरील सामूहिक बलात्कार, गर्भवती राहल्याने घटनेला वाचता; 6 नराधमांना अटक.

महाराष्ट्र विधवा महिलेवरील सामूहिक बलात्कार, गर्भवती राहल्याने घटनेला वाच्यता; 6 नराधमांना अटक

महाराष्ट्र विधवा महिलेवरील सामूहिक बलात्कार, गर्भवती राहल्याने घटनेला वाचता; 6 नराधमांना अटक.

पुणे जिल्हा प्रतिनिधी✒️

पुणे:- जिल्हातील शिरूर तालुक्यातुन महाराष्ट्राला हादळवणारी बातमी समोर आली आहे. एका 32 वर्षीय विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहितीने महाराष्ट्रा सह पुणे जिल्हात एकच हाहाकार माजला आहे. पीडित विधवा महिलेला 8 जणांनी अनेक स्थिकानी नेऊन आळीपाळीने अनेकदा बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6  नराधमांना अटक करुन बेळया ठोकल्या आहे.

पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार भोळसट असलेल्या एका महिले बरोबर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून पिढीत महिलेच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर संबंधित महिला एकटीच राहत आहे. महिलेच्या एकटेपणाचा भोळसट स्वभावाचा फायदा आरोपीनी उचला. पीडितेला वेळेवेळी घरात, शाळेच्या पाठीमागे, उसाच्या शेतात, नदी शेजारी झुडपात अश्या वेगवेगळ्या ठिकाणी नेत वेळोवेळी तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. 1 एप्रिल 2021 ते 31मे 2021 या दरम्यान घडला आहे. या बलात्काराच्या घटनेतून पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर संबंधित घटनेचा उलगडा झाला.

जीवे मारण्याची दिली धमकी आरोपीनी पीडित महिलेवर वेळोवेळी अत्याचार करत असताना असताना याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवेमारून टाकण्याची धमकी दिली. मरणाच्या भीतीने घाबरलेल्या संबंधित पीडित महिलेने याबाबत कुठंही वाच्यता केली नाही.

या प्रकरणी पोलिसांनी माऊली पावर, रज्जाक पठाण, काळू वाळुंज , विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज , नवनाथ वाळुंज या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने आरोपीना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चरपाले मॅडम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here