अल्पवयीन प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येने नागपुर जिल्हा हादळले, नेमकं कारण काय?

अल्पवयीन प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येने नागपुर जिल्हा हादळले, नेमकं कारण काय?

अल्पवयीन प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येने नागपुर जिल्हा हादळले, नेमकं कारण काय?

युवराज मेश्राम ✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपूर :- संपुर्ण नागपुर ला हादळणारी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपुर येथील राहणारे दोघेही अल्पवयीन. प्रेमिका सोळा वर्षाची आणि प्रेमी अठरा वर्षाचा. नाबालीक असल्याने लग्न करू शकत नाही. एकमेका सबोत राहू शकत नाही. प्रेमाची बोंब गावभर झाली म्हणून दोघेही चिंतेत होते. या चिंतेतूनच आपली बदनामी होईल म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विष प्राशन करून स्वतःला संपविले. शरीरात विष पुर्णत पसरल्याने त्यांना योग्य उपचार करता आले नाहीत. त्यात सुरज वगारे आणि रसिका गायकवाड यांचा मृत्यू झाला.

 नागपुर जिल्हातील नरखेड तालुक्यातील महेंद्रि येथे राहणारा 18 वर्षाचा तरुण सूरज वगारे हा त्याची प्रेमिका 16 वर्षाची रसिया गायकवाड ही तरुणी शिक्षणासाठी आपल्या मामाकडे नायगाव येथे राहात होती. सूरज आणि रसिकाची ओळख झाली. मनात प्रेमाचे अंकुर फुलले. एकमेकात इतके गुंतले की विरह सहन होत नव्हता. त्यांच्या प्रेमाची माहिती साऱ्या गावात झाली. अशातच दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी जलालखेडा येथे दोघेही पळून आले. तिथून ऑटोने मोवाडला गेले. मोवाडपासून दीड किमी अंतरावर गेले. गोधनी फाट्याजवळ दिलीप बोडके यांचे शेत आहे. त्या शेतावर दोघांनीही विषारी औषध प्राशन केले. उमरी येथील तरुण रस्त्याने जात होते. त्यांना सूरज आणि रसिका बेशुद्धावस्थेत सापडले.

त्या दोघांनाही मोवाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी त्यांना नागपूरला रुग्णालयात पाठविले. तिथे दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here