म्हसळा नगरीत युवासेना वतीने हनुमान चालीसा वाटप
✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा :-२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभु श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्वत्र जय श्री राम नामाचा जयघोष होत असताना,प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या आदल्या दिवशी म्हसळा नगरी मध्ये म्हसळा युवासेना वतीने सर्व ठिकाणी हनुमान चालीसा वाटप करण्यात आली,अनोखा उपक्रम राबवून युवासेना तर्फे स्वामी निष्ठा जपण्याचा संदेश देण्यात आला. सर्व विश्वाचे आराध्य दैवत मानले जाते ते म्हणजे प्रभु श्री रामचंद्र ५०० वर्ष प्रतिक्षेनंतर अयोध्या नगरीत पदार्पण होत आहे याच्या पेक्षा आनंद कोणताच नसणार आहे व प्रभु श्री राम यांचे प्रिय भक्त विर हनुमान आहेत. स्वामी निष्ठा जपत प्रत्येक घरोघरी हनुमान चालीसा वाटप केली आहे व स्वामी निष्ठा जपावी तर ती विर हनुमान यांच्या सारखीच असे युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी सांगितले. हनुमान चालीसा वाटप करण्यासाठी सर्व युवासैनिकांनी सहभाग घेतला.