ग्रामगीता महाविद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न
अमान क़ुरैशी
तालुका प्रतिनिधि
8275553131
सिंदेवाही :- दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर, येथे वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव `युवास्पंदन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 16, 17 व 18 जानेवारी रोजी महाविद्यालयात क्रीडा विभागा अंतर्गत अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, रनिंग अंतर्गतमध्ये पुष्परचना, रंगोली, पोस्टर, डिश डेकोरेशन, आनंद मेळावा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले.
दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी शहीद बालाजी रायपुरकर सभागृहात `युवास्पंदन’ वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमिर धमानी व उद्घाटक म्हणून मा. श्री. मनोज गभने, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चिमूर उपस्थित होते. प्रमुख अतिथी आणि उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले माननीय मनोज गभने यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भविष्यात यश संपादन करावयाचे असेल तर प्रत्येकाने आपले शील राखून नैतिकदृष्ट्या प्रामाणिक प्रयत्न करणे महत्त्वाचे असते असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. कु. श्रद्धा डोईजड यांनी केलं, प्रस्तावना प्रा. डॉ. वरदा खटी मॅडम आणि आभार प्रदर्शन प्रा. कु. नोविना आत्राम यांनी केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी गीत गायन, बचाव स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, नृत्य व नाटक स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला, मोठ्या उत्साहात हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. सरते शेवटी दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी विविध स्पर्धे अंतर्गत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या समारोपिय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. अमीर धमानी व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश डहारे, कार्यकारी प्राचार्य सर्वोदय महाविद्यालय शिंदेवाही, डॉ. जी. डी. देशमुख, कार्यकारी प्राचार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, नागभीड तसेच सांस्कृतिक संमेलन प्रमुख प्रा. डॉ. मृणाल वऱ्हाडे, क्रीडा प्रमुख प्रा. डॉ. संदीप सातव, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. वरदा खटी मॅडम, नॅक समन्वयक प्रा. डॉ. निलेश ठवकर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रथमता सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ. राजेश डहारे यांनी तरुणांनी जीवनात प्रयत्न करणे थांबवू नये, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, अपयशातूनच यशाचा मार्ग निश्चित होत असतो त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करीत राहणे आवश्यक असते असे मत व्यक्त केले. अतिथी म्हणून उपस्थित डॉ. जी. डी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना बाहेर काढण्यासाठीच अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. या कार्यक्रमाचे माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना चालना मिळाली आणि तो सफल झाला तर ती अशा कार्यक्रमाची यशस्विता असते असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अमीर धमानी सर यांनी शालेय अभ्यासातून विद्यार्थ्यांना विरंगुळा मिळावा आणि शालेय शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शालेय शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणाचे माध्यमातून अनेक विद्यार्थी यशस्वी झालेत त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्रा. कु. प्रज्ञा खोब्रागडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. सुमेध वावरे व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मृणाल वऱ्हाडे यांनी केलेत. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता प्रा. हुमेश्वर आनंदे, प्रा. संदीप मेश्राम, प्रा. विवेक माणिक, प्रा. अरुण पिसे, प्रा. डॉ. युवराज बोधे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी आणि परिसरातील गावकरी सुद्धा उपस्थित होते.