घुग्घूस शहरात दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

71
घुग्घूस शहरात दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

घुग्घूस शहरात दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

घुग्घूस शहरात दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

🖋️साहिल सैय्यद
📲 9307948197

घुग्घूस : 24 जानेवारी
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त बौद्ध सर्कल समिती, नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्या वतीने 26 व 27 जानेवारी रोजी दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात करण्यात आलेले आहे.
संमेलनाचे उदघाटन भंते करुणानंद थेरो, औरंगाबाद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भंते धम्मानंद,भंते धम्मबोधी थेरो,भंते श्रद्धारकखीत,भंते संघरत्न,भंते रत्नमनी थेरो हे उपस्थित राहतील.
भिक्खु संघातर्फे धम्म देशनाचा कार्यक्रम ही घेण्यात येईल.
भारतीय संविधाना समोरील आव्हाने व उपाययोजना या विषयावर परिसंवादाचे आयोजन मधुकर बावलकर ज्येष्ठ साहित्यिक आदीलाबाद तेलंगणा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. संजय मगर,विशेष अतिथी आ. किशोर जोरगेवार,नगरपरिषद मुख्याधिकारी, आभासचंद्र सिंह महाप्रबंधक वेकोली वणी क्षेत्र,पोलीस निरीक्षक आसिफराजा, पास्टर रेव्ह मार्कोस खांडेकर,सरदार सम्मत सिंग दारी, शहनाज पठाण,संचालिका इंदिरा गांधी महाविद्यालय,मधूकर मालेकर,अध्यक्ष सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ, हे उपस्थित राहतील. जागतिकीकरणाच्या युगात बौद्धांच्या स्वतंत्र अर्थव्यवस्थेची आवश्यकता हा परिसंवाद ठेवण्यात आला आहे तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा यांचा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे तसेच भारतीय संविधान स्त्रियांच्या सर्वांगिण उत्तथानाचे मार्ग या विषयावर चर्चासत्र ही या सोबतच युवकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग व आंबेडकरी चळवळी मध्ये युवकांची भूमिका हे देखील चर्चासत्र होईल
यासोबतच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमशाहिर साहेबराव येरेकर यांच्या प्रबोधन कार्यक्रम ही असणार असल्याची माहिती बौद्ध सर्कल समिती घुग्घुसचे अध्यक्ष भिमेन्द्र कांबळे,श्याम कुम्मरवार,देवानंद सुटे,भारत साळवे,अशोक रामटेके,भारत जीवने,दिप्ती सोनटक्के, नर्मदा खोब्रागडे, दिपक कांबळे,पियांशु कोवले,योगीता मून,उर्मिला लिहितकार,विजय रामटेके,सविता मंडपे,नवबौद्ध स्मारक समितीचे गंगाधर गायकवाड,सुजित सोनटक्के,शेख शमीउद्दीन,अशोक रामटेके,बबलू सातपुते,देवेन्द्र गेहलोत,मुरली चिंतलवार,अनिरुद्ध आवळे,रोशन पचारे,अमित बोरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.