समाज सेवक सत्यवान हरिश्चंद्र आंबेतकर यांचा भाजप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश व प्रमुख पदीनिवड
✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞संपर्क-७०२११५८४६०
कुटुंबे, गट आणि समुदायांना त्यांचे वैयक्तिक आणि सामूहिक कल्याण वाढविण्यास मदत करण्याचे धैर्य.शैक्षणिक व आरोग्यासंदर्भात व इतर वेळेस लोकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नेहमी पुढे. तसेच कायम गरिबीची झळ सोसल्याने सर्व सामान्य गोरगरीब जनतेसाठी धडपड करणारे समाजसेवक श्री .सत्यवान हरिश्चंद्र आंबेतकर यांनी भारत देशाचे पंतप्रधान-श्री. नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री -श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रगतशील काम व धेर्यशालीर्य विचारांना प्रेरित होऊन भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला असून.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी .राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डाजी ,भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.उप मुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस. माजी खासदार लोकनेते रामशेठजी ठाकूर.मा.आ.प्रशांत ठाकूर.रायगड जिल्हा अध्यक्ष मा.अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे धेय्य धोरण यांचे पालन करत जनतेला न्याय देण्याकरता भाजपा कळंबोली शहर मंडल सेक्टर १३ प्रमुख पदी निवड करण्यात आली.
मा.आ.प्रशांत ठाकूर.रायगड जिल्हा अध्यक्ष मा.अविनाश कोळी .भाजपा कळंबोली शहर मंडल अध्यक्ष-रविनाथ पाटील -पनवेल विभागातील नगरसेवक अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा अध्यक्ष मा.अविनाश कोळी यांच्या हस्ते सत्यवान हरिश्चंद्र आंबेतकर यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.