चंद्रपूर कृउबा समितीच्या उपसभापतीपदी सुनील फरकाडे यांची अविरोध निवड

109

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱8830857351

चंद्रपूर, 24 जानेवारी
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचे निधन झाल्याने रिक्त जागेसाठी बुधवारी निवड प्रक्रिया पार पडली. सुनील  फरकाडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
उपसभापतीपदाच्या निवडीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. आर. सारडा यांनी काम पाहिले. निवडीदरम्यान सुनील  फरकाडे व गणेश आवारी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. पण, काही वेळाने गणेश आवारी यांनी आपला अर्ज घेतला. त्यामुळे  फरकाडे यांची अविरोध उपसभापतीपदी निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल बाजार समितीचे सर्व संचालक, प्रशासक यांनी अभिनंदन केले आहे.