बजाज तंत्रनिकेतन तर्फे आंतरतंत्रनिकेतन हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

79
बजाज तंत्रनिकेतन तर्फे आंतरतंत्रनिकेतन हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

बजाज तंत्रनिकेतन तर्फे आंतरतंत्रनिकेतन
हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

बजाज तंत्रनिकेतन तर्फे आंतरतंत्रनिकेतन हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 24 जानेवारी
सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे मंगळवार, २३ जानेवारी रोजी मुलांची हॉलीबॉल स्पर्धा व २४ जानेवारी ला मुलींची हॉलीबॉल स्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी, २३ जानेवारीला सकाळी 10 वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे बजाज तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. ई. ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण 17 संघांनी मुलांच्या हॉलीबॉल सामन्यासाठी भाग घेतला होता, तसेच ४ मुलींच्या संघांनी भाग घेतला होता. मुलांच्या स्पर्धेमध्ये शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीने विजेतेपद पटकावले व बजाज तंत्रानिकेतनला उपविजेतेपद प्राप्त झाले. तसेच मुलींच्या सामन्या मध्ये विजेतेपद गायकवाड पाटील कॉलेजला मिळाले तसेच एन. आय. टी. नागपूर तंत्रनिकेतनला उपविजेतेपद मिळाले. स्पर्धेचे संचालन क्रिडा प्रमुख शर्मा यांनी केले, तसेच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक झाडे, मामीडवार, रेवतकर, मिटकर, प्रा. कांतीवार, प्रा. तळवेकर, मोगरे यांनी सहकार्य केले.