नेरळ पोलिस ठाणे येथे शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक पार पडली.

58
नेरळ पोलिस ठाणे येथे शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक पार पडली.

नेरळ पोलिस ठाणे येथे शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक पार पडली.

नेरळ पोलिस ठाणे येथे शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक पार पडली.
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ :- दि. २४ जानेवारी २४ नेरळ पोलिस ठाणे येथे शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक पार पडली. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शना खाली नेरळ, ममदापूर, दामत परिसरातील जेष्ठ व सामाजिक कमिटीचे सध्याच्या परिस्तिथी बद्दल चर्चा झाली.

जयेद नजे यांनी असे सांगितले की नेरळचा इतिहास आहे की आम्ही समस्थ नेरळकर सर्व सण, सर्व जयंत्या, हुरुस असो आनंदाने खेळी मेळीने साजरे करत आलो आहोत. त्याला कधीही गालबोट लागू दिला नाही. काही वेळा तशी परिस्थिती कदाचित निर्माण जरी झाली तरी आयुब भाई, मंगेश म्हस्कर, अंकुश शेळके, जयदास मोरे, ज्याकी भाई, सर्व जण एकत्र येऊन परिस्थिती हाताळत असतो.

या वेळेस ठवळे साहेब बोलले की मी कालच कळंब येथे हुरूस व कवाली चालू आहे त्या निमित्ताने गेलो असता आयोध्येतील राम मंदिराचा सोहळा पार पडला त्याची मिरवणूक निघाली पण कोठेच काही अनुचित प्रकार पाहायला मिळाला नाही. इतकी ऐकी सर्वान मध्ये आहे ही आनंदाची बाब आहे. पुढे चर्चेत असे बोलले की एकंदरीत पाहता परिसरात १६, १७ ते साधारण १९ वयोगटाची मुले ओंनलायीनच्या प्रसार माध्यमाद्वारे चुकीचे पोस्ट टाकत आहेत त्यांच्या वर पालकांनी लक्ष ठेवणे व जनजागृती करणे गरजेचे आहे. हे आपणच केली पाहिजे. समजा एकदा अश्या प्रकारे केस दाखल झाली तर संपूर्ण आयुष बरबाद होते. कोठेही सरकारी नोकरी मिळत नाही की शासनाचे लाभ मिळत नाही. साधारण १० ते १५ वर्षे कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. या वयातील विद्यार्थ्यांना या संकल्पनेनुसार, शांतता समिती तरुणांचा सहभाग वाढावा, त्यांना शहरात राबविल्या जाणाऱ्या विविध सण-उत्सव, धार्मिक, सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रमावेळी शांतता समितीच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल. ह्या बैठकीस स.पो.नि. हनुमंत शिंदे, पो.ह. देवेंद्र शिंगारे तसेच शांतता कमिटीचे सदस्या, उप सरपंच मंगेश म्हस्कर, जयेद नाजे, अंकुश शेळके, रोहिदास मोरे, चेतन गुरव, गोरख शेप, तैसीन सय्यद व साहित्यिक बंधू अभंगे तसेच पत्रकार उपस्थित होते.