उच्च माध्यमिक, माध्यमिक शालांत परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक नियुक्ती संदर्भात समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
✍️ निलेश सोनवणे ✍️
जळगाव तालुका प्रतिनिधी
मो :- 9922783478
जळगाव :- सविस्तर वृत्त असे की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी/ मार्च 2025 परीक्षा संदर्भातील राज्य मंडळांनी परीक्षा केंद्रासाठी शासनाच्या धोरणानुसार केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रा व्यतिरिक्त इतर अन्य शाळा उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही संदर्भातल्या पत्राच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदनात केंद्र संचालक व परीक्षक हे मूळ शाळे व्यतिरिक्त इतर शाळेत परीक्षेच्या ठिकाणी असल्याने इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गांसंदर्भात अडचणी येऊन शाळांना सुट्टी द्यावी लागेल तसेच बाहेरील परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व परीक्षक यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात, इयत्ता बारावी दहावीचे नियामक ज्यांना पेपर तपासणीचे काम देखील आपल्या शाळेतच करावे लागते अशा अडचणी सुद्धा येणार आहेत, आपल्या मूळ केंद्रापासून इतर केंद्रावर जाण्यासाठी वाहन भत्ता या संदर्भात देखील अडचणी निर्माण होऊ शकतात अशा संदर्भाच्या अडचणी निवेदनात मांडून हा निर्णय रद्द व्हावा अशी मागणी समन्वय समितीतर्फे करण्यात आलेली आहे. याप्रसंगी मा.आयुष प्रसाद साहेब यांनी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून शासनाची भूमिका समजावून सांगत समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या परीक्षेच्या संदर्भातील समस्या सविस्तररीतीने जाणून घेतल्या. समन्वय समितीतर्फे अध्यक्ष नारायण वाघ, समन्वयक तुळशीराम सोनवणे, कार्याध्यक्ष गोविंदा पाटील, डॉ. मिलिंद बागुल, शुद्धधोन सोनवणे, संतोष कचरे, सचिन जंगले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.