संविधान जागरूकता उपक्रमांतर्गत विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेत अमोल नासरे प्रथम
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे आयोजन

आशीष अंबादे प्रतिनिधी
वर्धा:- संविधान जागरूकता उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेत अमोल नासरे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा जिल्हा शाखेने मार्च-2020 मध्ये संविधान जागरूकता अभियान अंतर्गत विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षक, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतली होती.
भारतीय संविधानाला अपेक्षित शिक्षण आणि वर्तमान स्थिती, भारतीय संविधानातील शिक्षण हक्क कायदा- अपेक्षा आणि वास्तव, भारतीय संविधानातील कलमांचा शैक्षणिक धोरणावर प्रभाव’ या तीनपैकी एका विषयावर एक हजार शब्दात निबंध लेखन करावयाचे होते. प्रथम क्रमांकासाठी 10 हजार रुपयाचे बक्षीस गोकुलदास राऊत (अमरावती) यांचेकडून, द्वितीय क्रमांकासाठी 7 हजार रुपये बक्षीस शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी यांचेकडून तर तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रुपये बक्षीस विजय टोहरे (अकोला) यांच्याकडून देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पाच बक्षिसे देण्यात येणार असून प्रत्येकी दोन हजार रुपये शिक्षक समिती शाखा यवतमाळ, शिक्षक समिती शाखा वाशीम, जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज तेलंग, साईश्रद्धा अर्बन सहकारी पतसंस्था देवळी आणि विनोद धोबे (वर्धा) यांच्याकडून दिले जाणार आहे.
या निबंध स्पर्धेचा निकाल शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे, जिल्हाध्यक्ष रामदास खेकारे आणि प्रसिद्धी प्रमुख चंद्रशेखर ठाकरे यांनी जाहीर केला आहे. प्रथम क्रमांक अमोल नासरे, द्वितीय क्रमांक उज्ज्वला मोहन कोठे, तृतीय क्रमांक विनायक लिंगायत यांनी मिळविला आहे तर उत्तजनार्थ पुरस्कार निलेश इंगोले, कविता वनकर, डॉ. संदीप जवंजाळ, अर्चना काटेखाये आणि दिगंबर खडसे यांनी मिळविला आहे. निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण कोरोना परिस्थिती निवळाल्यापश्चात केले जाईल असे आयोजकांनी कळविले आहे.