रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या जे.ईश्वरीबाई यांच्या नावाने पोस्ट तिकीट प्रसिद्ध

मुंबई:- सरकार पोस्ट विभागाने रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार आंध्रप्रदेश सिकंदराबाद येथील नेत्या दिवंगत जे.ईश्वरिबाई यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला. आज हेद्राबाद येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रमुख उपस्थितीत,राज्याचे राज्यपाल बंगारु दत्तात्रय , जे.ईश्वरी बाई यांची मुलगी माजी मंत्री काँग्रेस च्या नेत्या गीता रेड्डी यांचे उपस्थितीत संपन्न झाला असून जे .ईश्वरिबाई यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या चळवळी त योगदान व जनसेवा केली असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. हया निर्णयाचं भारत सरकार चे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अभिनंदन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.असे जीवन बागडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्ष खोरीपा यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारें केले आहे.
