एक तर्फा प्रेमात पडून दुर्गाप्रसाद याने हातोड्याने केली प्रेमिकेची हत्या.

62

एक तर्फा प्रेमात पडून दुर्गाप्रसाद याने हातोड्याने केली प्रेमिकेची हत्या.

एक तर्फा प्रेमात पडून दुर्गाप्रसाद याने हातोड्याने केली प्रेमिकेची हत्या.

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞८७९९८४०८३८📞

रावणवाडी :- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ ला सकाळी ६:०० वा. रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झिलमिल चिरामनटोला या गावालगत रस्त्याने नामे धनश्री गोपाल हरीनखेडे वय १८ वर्षे ही सायकल चालवत कोचींग क्लासेसला जात असताना रस्त्यात थांबाऊन तिच्या डोक्यावर लोखंडी हातोड्याने मार मारुन तिला सायकील सकट रोडवर पाडून तिला हातोड्याने बेदम मारहाण करुन तिला रक्त रंभाड केले. ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. याची माहिती रावनवाडी पोलिस स्टेशन ला लागताच पो. स्टे. ठाणेदार श्री. उदय धामडे हे घटना स्थळी पोहचले व ठाणेदार यांनी धनश्री हिला गाडीत मांडून शासकीय रुग्णालय गोंदिया येथे नेले असता डॉ. साहेबांनी धनश्री हिला मृत घोषित केले. तिला पोस्टमारटंम साठी रुग्णालयात ठेवण्यात आले. लगेच आरोपी नामे दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले वय २३ वर्षे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पो.स्टे.ठाणेदार श्री उदय धामडे यांचे कडे असून पुढील तपास सुरु आहे.