नियम धाब्यावर ठेवून चालविली जेसीबी वस्तीतील पाईप फुटली, पाणीपुरवठा बंद

59

नियम धाब्यावर ठेवून चालविली जेसीबी
वस्तीतील पाईप पुटले . पाणीपुरवठा बंद

नियम धाब्यावर ठेवून चालविली जेसीबी वस्तीतील पाईप पुटले . पाणीपुरवठा बंद
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नाग भिड़-नागभीड नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ नवखळा येथे काल चक्क वस्तीत नवीन नाली बांधकाम साठी ठेकेदाने नियम धाब्यावर ठेवून वस्तीत जेसीबी चालविली यात वस्तीतील पाईप पुटले त्यामुळे वस्तीतील पाणीपुरवठा बंद झाल्याने वस्तीतील पिण्याच्या पाण्यासाठी महिलांच्या बोंबा सुरू झाल्या आहेत .
वस्तीच्या ठिकाणी नवीन नाली खोदकाम करतेवेळी वस्तीतल्या नागरिकांना त्रास होऊ नये या साठी ठेकेदारांनी नियम धाब्यावर ठेवून तय वस्तीच्या ठिकाणी खोदकाम करतेवेळी  जेसीबी चा वापर करून पूर्ण नाली खोदून ठेवणे चुकीचे आहे , केबल असो कि पाईप लाईन या नाली बांधकाम असो. अशा प्रकारचे खोदकाम मजूराच्या सहाय्याने काही मिटर पर्यंत टप्प्या टप्प्या ने  खोदून .खोदलेले काम पूर्ण करून .पुन्हा समोरचा काम  खोदने व पुढील काम करणे असाच नियम असताना सुध्दा संबंधित ठेकेदारानी प्रभाग क्रमांक ३ नवखळा येथील निरंजन गडमडे यांच्या घरा जवळ नवीन नाली चा खोदकाम जेसीबी ने खोदून पाईप लाईन फोडली . या कडे नगर परिषदेने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे .