सायबर फसवणूक रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन प्रबोधन, सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने खोपोली हिंदी विद्यालय येथे सायबर क्राईम रोखण्यासाठी मार्गदर्शन.
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड :-शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनातील लैंगिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने एक हक्काचं सहज व्यासपीठ शाळा व कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमा अंतर्गत दिनांक २३ फेब्रुवारी रोजी खोपोली हिंदी विद्यालय, खोपोली येथील विदयार्थ्यांना खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक हरेश काळसेकर यांनी प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले.
या सातत्यपूर्ण सुरू असणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून विदयार्थी अधिकाधिक जागृत होणे महत्त्वाचे असुन यामुळे भविष्यात ते स्वतः सोबत आपल्या कुटुंबीय व सहकारी यांना सायबरद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल हे समजून घेवून आपल्या जीवनात त्याचे अनुकरण करतील व भविष्यात नक्कीच देशाचे जागृत नागरीक होतील असा आशावाद खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खोपोली हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्रकुमार सिंह, सहशिक्षक भाईदास पाटील, जितेंद्र नरवडे, रेश्मा बांदल, मनीषा देशपांडे, अशोक जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.