चौदा व बारा वर्षांच्या मुलींवर वारंवार पाशवी कृत्य करणाऱ्या बापाला दूहेरी जन्मठेपेची शिक्षा
त्रिशा राऊत
नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं
मो.9096817953
नागपूर. आपल्या चौदा व बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर वारंवार पाशवी कृत्य करणाऱ्या नराधम बापाला विशेष पोक्सो न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चाळीस वर्षीय नराधम ॲटोचालक असून त्याच्या विरोधात तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.या प्रकरणी न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी निर्णय दिला. पीडित मुलींची आई १७ मे २०१९ रोजी रोजी मरण पावली. मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत या नराधम बापाने मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी देत आपल्या या पाशवी कृत्यांना प्रारंभ केला होता.
विशेष म्हणजे, दुसरे लग्न करूनही त्याने आपले कृत्य त्याने सुरूच ठेवले होते. वेदना असह्य झाल्याने पीडित मुलींनी पोलिसात जाण्याचा मार्ग निवडला. न्यायालयाने सर्व बाजू लक्षात घेत नराधम बापास पोक्सो कायद्यान्वये दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.दुसऱ्या पत्नीला सुनावणी संपतपर्यंत शिक्षा
विशेष म्हणजे पीडित मुलींच्या नातेवाइकांना ही बाब माहीत असूनही त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे, पोलिसांनी आरोपीची दुसरी पत्नी, मोठा भाऊ, वहिनी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने पोक्सोच्या कलम २१ प्रमाणे न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.