राष्ट्रीय संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची माणगांव तालुकास्तरीय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

47

राष्ट्रीय संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची माणगांव तालुकास्तरीय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

✍️ दिलीप करकरे ✍️
मुंबई प्रतिनिधी
📞७२०८७०८४५६📞

मुंबई : जगद्गुरु संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 648 व्या जयंतीचे आयोजन संत रोहिदास विकास मंडळ माणगाव यांच्या वतीने दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी माणगाव तालुका समाज मंदिर येथे करण्यात आले होते .
ठरलेल्या वेळेप्रमाणे संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

जयंतीचे अवचित्य साधून चर्मकार समाजातील दहावी-बारावी उत्तीर्ण तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय पातळीवर नेत्र दीपक कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह तसेच वह्या वाटप करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
माणगाव तालुका कमिटीच्या वतीने माणगाव तालुक्यात 28 गावांचा समावेश आहे,सन्मान म्हणून त्या त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचा मंचावरती पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे अशोक नारायण चांदोरकर. मंदार विठ्ठल चांदोरकर तसेच गणेश भिकू गोरेगावकर यांचा माणगाव तालुका कमिटीच्या वतीने समाज मित्र म्हणून सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार सर्व उपस्थित सर्व समाज बांधवांच्या साक्षीने देण्यात आला.
चर्मकार समाजातील नुकतीच डॉक्टर पदवी मिळवलेल्या मृणाल विष्णू नांदवीकर यांचा देखील समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उपस्थिती चर्मकार सामाजातील अभ्यासु वेक्तीनी जमलेले सर्व समाज बांधव भगिनी यांना संबोधित करत असताना संत रोहिदास महाराज यांचे कार्य योगदान समजावून देण्याचे काम प्रबोधनातून केले. माणगांव तालुक्यातील 28 ते 30 गावातील समाज रोहिदास महाराज जयंती निमित्त एकवटला होता आणि यातून चर्मकार (चांभार ) समाजाची एकता दिसून येते. . मंडळाचे अध्यक्ष संतोष पुगावकर यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीसाठी उपस्थित सर्व समजबांध वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत घेऊन केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव राजेश इवलेकर आणि सहसचिव नितेश पुरारकर यांनी केले