पीएनपी चषकाचा मानकरी ठरला बेलोशी बिग बुल्स संघ

64

पीएनपी चषकाचा मानकरी ठरला बेलोशी बिग बुल्स संघ

पाच लाख रुपये व चषक देऊन संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- पीएनपी चषक 2025 टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना बेलोशी बिग बुल्स आणि वरसोली चॅलेजर्स या संघामध्ये झाला. या दोन संघातील चुरशीच्या लढतीमध्ये बेलोशी संघाने वरसोली संघाला पराभूत करून विजय मिळवून पीएनपी चषकावर शिक्का मोर्तब केला. या संघाला पाच लाख रुपये व चषक असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, पीएनपीचे सर्वेसर्वा नृपाल पाटील, यु.व्ही स्पोटर्स ॲकेडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अँड. मानसी म्हात्रे, प्रदिप नाईक, द्वारकानाथ नाईक, ॲड. प्रवीण ठाकूर, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बेलोशी बिग बुल्स संघाचे संघ मालक निनाद रसाळ, अशीष नाखवा, वरसोली चॅलेंजर्स संघाचे संघ मालक सुरेश घरत, नांदगाव निंजास संघाचे संघ मालक सरोज दिवेकर, कर्णधार, खेळाडू व प्रेक्षक, क्रिडा प्रेमी, पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना,यु. व्ही स्पोर्टस्‌‍ ॲकेडमीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यु. व्ही स्पोर्टस्‌‍ ॲकेडमी आयोजित पीएनपी चषक 2025 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 19 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत आझाद मैदान कुरुळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील 24 निमंत्रित संघाने सहभाग घेतला होता. पाच दिवस डे – नाईट ही स्पर्धा रंगली. लाखोच्या संख्येने या स्पर्धेचा आनंद प्रेक्षकांनी लुटला. शनिवारी सायंकाळी सुपर थ्री मधील बेलोशी बिग बुल्स, वरसोली चॅलेंजर्स आणि नांदगाव निंजास या संघामध्ये लढत झाली.
अंतिम सामन्याची लढत वरसोली चॅलेंजर्स आणि बेलोशी बिग बुल्स या संघामध्ये झाली.यामध्ये
पीएनपी चषक 2025 मानकरी बेलोशी बिग बुल्स ठरला.तर उपविजेता वरसोली चॅलेंजर्स संघ ठरला. या उपविजेत्या संघाला तीन लाख रुपये व चषक असे द्वीतीय क्रमांकाचे आणि नांदगाव निंजास संघाला तृतीय क्रमांकाचे दोन लाख रुपये व चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे समालोचन संदीप जगे, महाराष्ट्रातील नावाजलेले समालोचक आणि स्थानिक समालोचक यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पीएनपी चषकाची टिम व इतर सहकारी तसेच प्रत्येक्ष क्रिकेट मॅच पाहणारे प्रेक्षक व यूट्यूबच्या लाखो प्रेक्षकांचे स्पर्धेचे आयोजक नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
————
विजेत्यांकडून बक्षीसांची लुट
स्पर्धेतील फायनल सामनावीर – मंथन डाकी , फायनल हॅट्रिकवीर – संकल्प म्हात्रे, सर्वोत्कृष्ठ गोलंदाज – स्वराज देवळे ,सर्वोत्कृष्ट फलंदाज – हर्षद टावरी , सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- मंथन डाकी, सर्वाधिक षटकार – सौरभ गव्हाणकर, सर्वाधिक चौकार – शिरू वीक, मालिकावीर – मुस्तकीम मुकादम यांना गौरवण्यात आले. मुस्तकीम मुकादम यांना टोयाटो ग्लॅन्झा कार, स्वराज देवळे, हर्षद टावरी यांना दुचाकी तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एलईडी टीव्ही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले तर संघ मालकाला 55 इंची एलईडी टीव्ही तसेच कुपन लकी ड्रॉ मार्फत विजेत्यांना रोज टीव्ही व मोबाईल भेटवस्तू देण्यात आली.