Loan scheme for youth from Maratha and Brahmin communities.
Loan scheme for youth from Maratha and Brahmin communities.

मराठा व ब्राम्हण समाजातील युवकांना उद्योग व्यवसायसाठी कर्ज योजना.

Loan scheme for youth from Maratha and Brahmin communities.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर दि. 23 मार्च :- मराठा व ब्राम्हण समाजातील बेरोजगार युवक युवतीना आर्थिक मदतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनअंतर्गत कर्ज योजना आखण्यात आली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेचे जिल्हास्तरीय समन्वयक अमरीन पठान यांनी या संदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये मराठा, ब्राम्हण समाजातील बेरोजगार युवक, युवतींना आर्थिक मदतीचा हात देत स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरु केलेली आहे. राज्यात आतापर्यंत एक हजार 900 कोटी रुपयचे कर्ज वाटप करण्यांत आलेले आहे व 23 हजार 150 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

चंद्रपूर जिल्हयामध्ये या संदर्भात लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी असून मोठया संख्येने जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवहान जिल्हा समन्वयक द्वारा करण्यांत आले आहे. राज्य शासनाने प्राधान्याने ज्यांच्या करिता कोणतेही महामंडळ अस्तिवात नाही अशा फक्त महाराष्ट्रातील मराठा प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना सुरु केलेली आहे. उमेदवारांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणारी ही राज्य शासनाची एकमेव योजना आहे. बँकानाही या योजनेबाबत विश्वास निमार्ण झालेला आहे, या योजनेचा लाभ कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम तसेच लघू मध्यम उद्योगासाठी घेण्यात यावा. उत्पादन, व्यापार, विक्री, सेवा या क्षेत्रासाठी देखील या योजनेतून कर्ज उपलब्ध केल्या जाते. पुरुषासाठी 18 वर्षापासून 50 वयोगटात पर्यंत तर महिलांसाठी 18 ते 55 अशा वयोगट निश्चित करण्यांत आले असून यातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट व कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन विभागातंर्गत कर्ज देण्याची सोय करण्यात आलेली आहे.

या योजनेला जिल्हयात देखील चांगला प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने केली असून अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य ‍विकास कार्यालय प्रशासकीय भवन, पहिला मजला, येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त भै. गो. येरमे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here