सावनेर येथे विमा प्रतिनिधी चे काम बंद आंदोलन


अनिल अडकिने सावनेर तालुका प्रती

सावनेर-23:- सावनेर लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया लियाफी या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार व एल आय सी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज हुतात्मा दिनी मंगळवारला विमा प्रतिनिधींनी येथील एल आय सी कार्यालयासमोर एक दिवसीय देशव्यापी कामबंद आंदोलन केले. संपूर्ण देशात आज लियाफी या अभिकर्त्यांच्या संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आज हुतात्मा दिनी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते.
त्याच आंदोलनाला यशस्वी करण्याच्या हेतूने येथील लियाफी संघटनेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांच्या मार्गदर्शनाखाली एल आय सी कार्यालयासमोर सामाजिक दुरीचे पालन करत शेकडो अभिकर्त्यांनी काम बंद आंदोलन केले.
या आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी सकाळी १० वाजता पासूनच विमा अभिकर्त्यांनी सामाजिक दुरी पाळत स्वेच्छेने कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.
मार्च महिन्यात लक्ष पूर्ण करण्याच्या प्रयत्नात सदैव व्यस्त असलेले अभिकर्ते कार्यालयासमोर विश्रांती करत सायंकाळ पर्यंत ठाण मांडून बसले होते.
येथील एल आय सी कार्यालयात विमा प्रतिनिधी च्या काम बंद आंदोलनामुळे एकही नवीन विमा पॉलिसी काढली गेली नाही तसेच कुठल्याही प्रकारचे नगद व चेक द्वारा व्यवहार झाला नाही.
विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यांसाठी व होत असलेल्या आंदोलना संदर्भात येथील शाखा व्यवस्थापक युवराज हातझाडे यांना लियाफी संघटनेचे अध्यक्ष व विमा प्रतिनिधीनी पत्र देण्यात आले.
विमा पॉलिसीवरील gst बंद व्हावा, पॉलिसी कर्जावरील व्याज कमी व्हावे, एल आय सी चे खाजगीकरण होऊ नये, विमा पॉलिसी ची ऑनलाईन विक्री बंद करावी, विमा प्रतिनिधी च्या ग्रॅच्युटी मध्ये वाढ व्हावी, प्रतिनिधींच्या आरोग्य विम्यात वाढ व्हावी. अश्या विविध मागण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here