मुंबई 70 हजारांची लाच घेणारा महानगर पालिकेचा कनिष्ठ अभियंता ताब्यात.
✒️राज शिर्के प्रतिनिधी✒️
मुंबई:- महानगर पालिकेची परवानगी न घेता घराचे बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रक्टरकडे 70 हजाराची लाच मागून ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वीकारणारा गोवंडी एम पूर्व विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील मासोदे याला अॅण्टी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडल आहे.
महानगर पालिका गोवंडी एम पूर्व विभागातील कनिष्ठ अभियंता असलेले सुनील मासोदे यांच्या विरोधात तक्रार देणारे पत्रकार असून त्यांच्या मित्राचा शिवाजी नगर परिसरात घर बांधकामाचा व्यवसाय आहे. त्या कॉन्ट्रक्टरने एका घराचे बांधकामाचे काम घेतले होते. मात्र त्यासाठी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याने जर त्या बांधकामावर कारवाई होऊ द्यायची नसेल तर 70 हजार द्यावे लागतील, अशी मागणी मासोदे याने केली. परंतु लाच द्यायची नसल्याने कॉन्ट्रक्टरच्या पत्रकार मित्राने अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मासोदे याच्या सांगण्यावरून कॉन्ट्रक्टरकडून 70 हजारांची लाच घेताना कर्मचारी अमर तांबे यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर सुनील मासोदे यालादेखील ताब्यात घेण्यात आले.