Provide financial assistance from the government by surveying the crop damage caused by untimely rains and hailstorms - Former MLA Prof. Raju Timande.
Provide financial assistance from the government by surveying the crop damage caused by untimely rains and hailstorms - Former MLA Prof. Raju Timande.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्वे करून सरकारतर्फे आर्थिक मदत द्या – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे.

अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई देण्याची मागणी.

 Provide financial assistance from the government by surveying the crop damage caused by untimely rains and hailstorms - Former MLA Prof. Raju Timande.

✒ अक्षय पेटकर, प्रतीनिधी ✒

हिंगणघाट 23 मार्च:- वर्धा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्वे करून सरकारतर्फे आर्थिक मदत मिळण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.

मार्च महिन्यात उन्हाळ्याच्या दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दिनांक 18 मार्च पासून झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या शेताचा सर्वे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

अवकाळी पाऊस, वारा व गारपिटीमुळे सिंधी (रेल्वे),आर्वी, कारंजा तसेच वर्धा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काठणीला आलेला गहू, चणा, कांदा, भाजीपाला, पपईचे पीक, केळी तसेच भुईमूग, रब्बी तसेच उन्हाळी विविध पीक घेणाऱ्या इत्यादी पिकांचे नुकसान झालेले आहे तर शेतात पडलेले कुटाराचे ढीग ओले झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वादळीवाऱ्यामुळेघरावरील टीम पत्रे उडाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

18 मार्चपासून अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह काही गावात गारपीट झालेली आहे तरी सरकारने सर्वे करून शेतकऱ्यांच्या शेतात झालेले नुकसान लक्षात घेता आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री यांना करण्यात आली.

 वर्धा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्वे करून सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यात यावी.
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here