मिरज मधील महात्मा फुले उद्यानाची हेटाळणी थांबवा अथवा तीव्र आंदोलन.
वंचित बहुजन युवा आघाडीची आक्रमक भूमिका.
✒मिरज प्रतिनिधी✒
मिरज,दि. 24 मार्च :- मिरज मधील महात्मा फुले गार्डन कित्येक वर्षे झाली नादुरुस्त अवस्थेत असून महात्मा फुले यांची कित्येक वर्षे झाली इथलं शासन-प्रशासन विटंबना करत आहे. सदर गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. तरी सदर या विटंबना होत असल्याने वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्ती व विटंबना थांबली पाहिजे असे सांगून सुद्धा झाली नसल्याचे आढळण्यात दिसून आले आहे. तरी 15 दिवसाच्या आत उद्यानाची दुरुस्ती न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अध्यक्ष प्रशांत (दादा) कदम, शरद वाघमारे, सिद्धार्थ लोंढे, सागर आठवले, मिलिंद कांबळे, निखिल कोलप, निशांत भंडारे, डॉ. संतेश्वर भंडारे आदी उपस्थित होते.