शीर वेगळ झाल धड वेगळं झाल. शीर पडले लोकलच्या डब्यात; धड पडले रेल्वेट्रक वर.
✒राज रोक्काया प्रतीनीधी✒
अंबरनाथ,दि.24 मार्च:- मुंबई लोकल ट्रेन मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणे किती जीवावर येऊ शकते, याच उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आले आहे. दरवाजात लटकून प्रवास करताना रेल्वेच्या खांबाला डोके आपटून शीर धडावेगळं झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या यार्डात असलेल्या लोकल डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईहुन आलेली लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकात सायडिंगला गेली होती. त्यानंतर ही घटना समोर आली.
रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उजेडात आली. मुंबईहून एक लोकल यार्डात सायडिंगला लागली होती. त्याचवेळी लगेजच्या डब्यात एका तरुणाचे धड नसलेले शीर आढळल्याचे स्टेशन मास्टरांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी अंबरनाथ यार्डात जाऊन शीर ताब्यात घेत व्यक्तीचे धड शोधायला सुरुवात केली.
याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी हे शीर ताब्यात घेत धडाचा शोध सुरू केला. ज्या डब्यात हे शीर आढळले होते, त्या डब्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रक्त उडाले होते. त्यामुळे पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने शोध घेतला असता उल्हासनगर आणि अंबरनाथच्या मध्ये सुभाष टेकडी जवळ रेल्वे रुळजावल हे धड आढळून आले. या व्यक्तीचे नाव हितेंद्र राजभर असल्याचे तपासात समोर आले आहे. हितेंद्र हा रात्री पाऊण वाजताच्या सुमारास उल्हासनगरहून अंबरनाथला यायला निघाला. मात्र दरवाजात उभा असताना अचानक त्याचे डोके खांबाला आपटले.
ही धडक इतकी जोरदार होती, की त्याचे शीर धडावेगळं होऊन डब्यात पडले, तर धड खाली पडले. याप्रकरणी आणि जीआरपीचे एसीपी सुनील पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनेमुळे लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणे किती जीवघेणे ठरू शकते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.” या घटनेमागे कोणताही घातपात नसून हा निव्वळ अपघात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर हा अपघात घडल्याची शक्यता आहे.