नव-याचा झाला ह्रदयविकाराने मृत्यू, त्यानंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होते घरामध्ये.
✒️औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी✒️
औरंगाबाद,दि.24 मार्च:- औरंगाबाद येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे हयगय व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील बन्सीलाल नगरातील अजिंक्य फिलोसिया या अपार्टमेंटमध्ये एक 70 वर्षाचं वृद्ध पती पत्नी राहतं होतं. मात्र या दोघांचाही 8 दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचं आज समोर आलं आहे. मृत्यूनंतर त्या दोघांचाही मृतदेह त्यांच्या राहत्या घरात 8 दिवस कुजत राहीला आणि त्यांच्या मृत्यूची 8 दिवस कोणालाही माहिती नव्हती.
संबंधित जोडप्याचं आडनाव म्हेंदळे असून पत्नीचं नाव माधुरी विजय म्हेंदळे तर पतीचं नाव विजय माधव म्हेंदळे असं होतं. हे दोघेही अजिंक्य फिलोसिया या अपार्टमेंटमधील फ्लॅट नं 403 मध्ये राहत असून गेल्या 15 ते 16 दिवसांपासून यांना कोणीही घराबाहेर पाहीलं नव्हतं. तसंच काही दिवसांनंतर त्यांच्या घरातून अतिशय उग्र वास येऊ लागल्यामुळे प्रमोद नावाच्या एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली.
पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराला आतून कडी असल्याकारणाने पोलीस छतावर जाऊन गॅलरीत उतरले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढले. म्हेंदळे यांच्या मुलांची माहिती शोधल्यानंतर त्यांना एक मुलगी असल्याचं समोर आलं.
दरम्यान, दोन्ही मृतदेहांची तपासणी केल्यानंतर विजय म्हेंदळे यांना सोरायसीस आजार असल्याचं समोर आलं. तसेच माधुरी म्हेंदळे यांना पॅरालिसेस झाल्याचं देखील समोर आलं. म्हेंदळे यांची मुलगी अमेरिकेमध्ये राहत असून तिला येणं शक्य नसल्याचं तिने पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनीच त्या दोघांचा अंत्यविधी पार पडला.