भायखळ्यातील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई उद्यानात पर्यटक घेणार व्हिक्टोरिया बग्गीची सफरीचा आनंद.

44

भायखळ्यातील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई उद्यानात पर्यटक घेणार व्हिक्टोरिया बग्गीची सफरीचा आनंद.

Tourists will enjoy the Victoria Buggy ride at the famous Veermata Jijabai Park in Byculla.

✒️नीलम खरात प्रतिनिधी ✒️
भायखळा,दि.24 मार्च:- येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात झाडे, पशु-पक्ष्यांबरोबर पर्यटकांना लवकरच ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया बग्गीची आनंद घेता येणार आहे. लहानग्यांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच बग्गीतून बागेत साफरी करता येणार आहे.

मुंबईतील पर्यटनाला चालना देतानाच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक गाडय़ांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्याच संकल्पनेतून घोडय़ांशिवाय इलेक्ट्रिक पद्धतीची ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया बग्गी मुंबईतील प्रसिद्ध पार्क मध्ये धावणार आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहाल बघायला मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे महानगर पालीका पर्यटकांसाठी अशी खास व्हिक्टोरिया बग्गीची सफरी सुरु करत आहे. त्यामुळे ही बग्गी एक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

सगळ्यांसाठीच ही इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बग्गीला दोन्ही बाजूने दरवाजे बसवणे, उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून बग्गीवर आकर्षित छप्पर या सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून लवकरच प्राणि संग्रहालयात पर्यटकांच्या सेवेत ही इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी दाखल होईल.