वर्धा पत्नीच्या अनैतिक संबंधात आड येणा-या सेवानिवृत्त जवानाची पत्नीने केली हत्या.

50

वर्धा पत्नीच्या अनैतिक संबंधात आड येणा-या सेवानिवृत्त जवानाची पत्नीने केली हत्या.

Wardha's wife kills retired soldier

✒मुकेश चौधरी प्रतीनिधी✒
वर्धा,दि 24 मार्च:- वर्धा जिल्हातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा येथील नागठाणा शिवारात शनिवारी सेवानिवृत्त आर्मी जवान विजय गणवीर यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांची हत्या झालाची संशय काही लोकांनी व्यक्ती करण्यात आल्याने पोलिसांनी त्या एन्गलने तपास केला असता त्यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड झाले आहे. यात मृताच्या पत्नीसह तिचा प्रियकर रामेश्वर आघाव आणि एका सहकारी महिलेला अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारतीय सेनेतुन सेवानिवृत्त घेतलेले विजय गणवीर हे आपल्या पत्नी बरोबर वर्धा परीसरातील नागठाणा येथे राहत होते. विजयच्या पत्नीचे बोरगाव येथील रामेश्वर आघाव याच्याशी सूत जुळले होते. शनिवारी विजय नागपूर येथे सैनिक कॅन्टीनमध्ये खरेदीसाठी गेला होता. विजय नेहमी उशिरा येत असल्याने तिने रामेश्वरला घरी बोलावून घेतले. एरवी उशिरा येणारा विजय शनिवारी दुपारीच घरी आला. पत्नीला परपुरुषासोबत पाहून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, जाडसर वस्तूने डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. यातच विजयचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृत विजयच्या पत्नीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता रामेश्वर आघाव तसेच संध्या जोगे यांच्या मदतीने हे घडवून आणल्याचे सुनीता हिने चौकशीत कबुली दिली. प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.