अरविंद केजरीवाल यांनी केले काश्मीर फाइल्स चित्रपटाबद्दल धक्कादायक विधान,म्हणाले...

अरविंद केजरीवाल यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका,पंतप्रधानांनी गेली आठ वर्षे वाया घालवली

अरविंद केजरीवाल यांनी केले काश्मीर फाइल्स चित्रपटाबद्दल धक्कादायक विधान,म्हणाले…

सिद्धांत
२४ मार्च, मुंबई: देशभरातून विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून “द काश्मीर फाइल्स” चित्रपटाला विविध राज्यात टॅक्स फ्री करण्याची मागणी केली जात आहे. दिल्लीमध्ये द काश्मीर फाइल्स चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यास मनाई करण्यात आली. यामुळे भाजप समर्थकांकडून दिल्ली सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती.

त्यावर उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेत्यांच्या या मागणीवर सडकून टीका केली. आपल्या भाषणात ते म्हणले कि, संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नेते देशभर काश्मीर फाइल्सचे पोस्टर गल्लीबोळांमध्ये चिटकवत आहेत. ह्यासाठी भाजप राजकारणात आली होती का? घरी गेल्यावर आपल्या मुलांनी विचारले कि तुम्ही काय काम करून आलात आज? तर काय सांगाल गल्लीबोळात पिक्चरचे पोस्टर्स चिटकवून आलो. असा प्रश्न त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारला.

द काश्मीर फाइल्स चित्रपट टॅक्स फ्री

काश्मीर फाइल्स चित्रपट टॅक्स फ्री करण्यासंदर्भात ते पुढे म्हणाले कि, चित्रपटाचे दिग्ददर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपला चित्रपट युट्यूबवर टाकावा. जेणेकरून सगळ्यांनाच तो चित्रपट फ्री मध्ये पाहता येईल. चित्रपट टॅक्स फ्री करायची काय गरज आहे? काही दिवसांपूर्वी हरिणामधील एक भाजप नेत्याने काश्मीर फाईल्सचा शो एका पार्कमध्ये मोफत लावण्याचे जाहीर केले होते.हे कळताच चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना ट्विट करून तो शो मोफत न ठेवता लोकांकडून त्याचे पैसे घेण्याची मागणी केली होती. काश्मीर पंडितांच्या नावावर काही लोक करोड रुपये कमावत आहेत आणि तुम्हाला पोस्टर लावायची काम दिली आहेत. डोळे उघडून जरा बघा.. असे तिखट आवाहन केजरीवाल यांनी भाजपच्या नेत्यांना केले.

https://youtu.be/s832gZadQ_8

 

हे आपण वाचलंत का?

 

नरेंद्र मोदींनी आठ वर्षे वाया घालवली

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत अरविंद केजरीवाल म्हणाले कि, देशाच्या पंतप्रधानपदी आठ वर्षे सत्ता केल्यानंतरही आपली लोकप्रियता राखण्यासाठी विवेक अग्नीहोत्री सारख्या दिग्दर्शकाच्या आश्रयाला जावे लागते. याचा अर्थ असा आहे कि, आठ वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी काहीच काम केले नाही. पंतप्रधानांनी गेली आठ वर्षे वाया घालवली असे रोख विधान अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणातून केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here