कामठी च्या तरुणीने विष प्राशन करूण सिहोरा येथे केली आत्महत्या
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी * 8308726855,8799840838
सिहोरा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येणारे मौजा सिहोरा या गावी दिनांक १२ मार्च रोजी होळी निमित्ताने आपल्या आई वडिलांसोबत काकाकडे आलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तरुणीने विष प्राशन करूण आत्महत्या किल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे रोज सोमवार दिवशी घडली. मृतक तरुणीचे नाव स्लिती अजय कठाने वय २० वर्षे रा. कामठी हिने आपल्या काका नामे संजय मधुकर कठाने यांच्या घरी होळी आटोपल्या नंतर रविवारला सायंकाळी विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच तिला तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान रोज सोमवारला तिचा मृत्यु झाला. अभ्यासाचा जास्त तान असल्याने तिने आत्महत्या केल्याची माहीती आहे. ति होळी निमित्ताने आपल्या आई वडिलांसोबत आपल्या काकाच्या घरी आली होती. या प्रकरणी संदीप मारोतराव नागदेवे रा. निरोडा यांनी सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावरुण पोलीसांनी आकस्मित मृत्युचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरकुंडे करीत आहेत. या घटनेने सिहोरा गावात हळहळ व्यक्त होत असल्याने पुढील तपास सिहोरा पोलीस अधिकारी हे करीत आहे.