मोहाडी येथे शहीद दिना निमित्त AISF व NSS तर्फे भव्य रक्तदान शिबीर
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞
मोहाडी :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील नटवरलाल जशभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी येथे दिनांक २३ मार्च २०२२ रोज बुधवारी शहीद दिना निमित्त क्रांतीकारी शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव व शहीद राजगुरू यांना आदरांजली म्हणून एआयएसएफ भंडारा व एनएसएस एन जे पटेल कॉलेज मोहाडी, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन ग्रामीण रुग्नालय मोहाडीचे वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ. चव्हान शाहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. चव्हान मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले. शिबीराचे उदघाटन समारोह प्रसंगी आपले उद्घाटीय भाषणातुन डॉ. चव्हान शाहेब यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास वाचण्याचे व शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रेरणेने देश शेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन युवकांना केले. प्रमुख अतिथी म्हणून डोंगरगाव जि.प. क्षेत्रातील सदस्य मा.श्री. देवाभाऊ इलमे यांनीही रक्तदानासाठी युवकांना प्रेरीत केले. तसेच येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला रक्तदान करण्याचे आव्हाहन केले. या प्रसंगी मंचावर डॉ. मृणाल हेडाऊ, आयटीआय कॉलेज चे बावणकुळे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्या अर्पन करूण अभिवादन करण्यात आले, एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. बी. भैसारे यांनी प्रास्ताविकेतुन शहीद दिन व रक्तदान शिबीर आयोजनाची पार्श्वभूमी सांगतांना कॉम्रेड वैभव चोपकर ( ए आय एस एफ अध्यक्ष मोहाडी ) व त्याच्या टिमचे परिश्रम कथन केले. व मोठ्या संख्येने तयार असलेल्या रक्तदात्यांचे कौतुक केले.
यात एकून २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकीचे उदाहरण दिले. यामध्ये आयटीआय कॉलेज चे विद्यार्थी, एन जे पटेल कॉलेज चे माझी विद्यार्थी व ए आय एस एफ चे सदस्य यांचा मोठा समावेश होता. मयुर गोमासे ए आय एस एफ जिल्हा कोषाध्यक्ष यांनी शहीद भगतसिंग यांच्या जिवनावर आधारीत एक गीत गायले. या प्रसंगी प्रा. डॉ. पांडे मॅडम, प्रा. डॉ. पवार सर, प्रा. डॉ. राऊत मॅडम, प्रा. डॉ. डाकरे मॅडम, प्रा. डॉ. वानखेडे सर, प्रा. डॉ. वरकडे सर, प्रा. जाधव सर एन.जे. पटेल कॉलेज व आयटीआय कॉलेज चे विद्यार्थी तसेच एआयएसएफ चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारोहाचे संचालन वैभव चोपकर तर आभार प्रदर्शन स्नेहल कुलरकर यांनी केले. त्यावेळी मीडिया वार्ता न्युज चे भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी मा. भवनभाऊ लिल्हारे ( पत्रकार ) हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ITI कॉलेज चा विशेष सहकार्य लाभले. तसेच शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी सार इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅकर चे इंजि. आश्विन बडवाईक, इंजि. सुनिल बावणे, इंजि. राजन बोंदरे, तसेच कॉम्रेड मिनाक्षी मेहर, सचिव एआयएसएफ मोहाडी, आशिष कोहळे, ओम पराते, खी बावणे, संदिप शेंडे, प्रशांत नागपूरे, दिपक डेकाटे, क्रॉम्रेड प्रेरणा सिंगनजुडे, एआयएसएफ तुमसर यांचे सहकार्य लाभले. व रक्तदात्यांना फल फ्रुट देऊन त्यांचा आभार मानुण कार्यक्रम संपविण्यात आले.