भिसी येथे विठ्ठल मंदिर मध्ये भागवत सप्ताह ला सुरुवात
*गणेश सिताराम गभणे*
*चिमूर तालुका प्रतिनिधी*
*7798652305*
चिमूर : – श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी येथे मागील 54 वर्षा पासून सुरू असलेल्या श्री एकनाथी भागवत सप्ताहाचे 55 वे वर्षिय श्री एकनाथी भागवत सप्ताह ला दिनांक 22 मार्च 2022 ला सुरुवात झालेली असून या एकनाथी भागवत समाप्ती दिनांक 29 मार्च 2022 ला गोपालकाला व महाप्रसादाने होणार आहे भिसी व भिसी परिसरातील जनतेला मागील दोन वर्षा पासून कोरोना च्या प्रभावा मुळे भागवत सप्ताहाचा आनंद हिरावून घेतलेला होता त्या मुळे या वर्षी सुद्धा भिसी वासीय जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झालेला होता की या वर्षी सुद्धा भागवत सप्ताह होणार की नाही पण सरकारनी कोरोना महामारिच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिथिलता दिली आणि भिसी परिसरातील जनतेला आनंदक्षण दिसून आले. भिसी नगरी रोषणाईने आणि भागवती कीर्तनाने दुमदुमली भिसी व भिसी परिसरातील हजारो भक्त या भागवत साप्ताहाच्या आनंदात तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे.