लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय होय: डॉ. विनोद मडावी यांचे कोविड लसीकरणाचे महत्व व आरोग्य व्यवस्थापन परिसंवादामध्ये मत

लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय होय: डॉ. विनोद मडावी यांचे कोविड लसीकरणाचे महत्व व आरोग्य व्यवस्थापन परिसंवादामध्ये मत

लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय होय: डॉ. विनोद मडावी यांचे कोविड लसीकरणाचे महत्व व आरोग्य व्यवस्थापन परिसंवादामध्ये मत

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

‘ नागभिड-लसीकरण हाच कोरोनावरील प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय होय’ असे डॉ. विनोद मडावी यांनी कोविड लसीकरणाचे महत्व व आरोग्य व्यवस्थापन परिसंवादामध्ये मार्गदर्शक म्हणून आपले मत व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ” स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कोरोना व मतदान जागृतीसाठी युवाशक्ती ” यासंकल्पनेवर आधारीत विषेश शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल कोरपेनवार यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा वासाळा मेंढा येथे आयोजित करण्यात आला. आज सकाळच्या सत्रात श्रमदानातून शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली .
दुपारच्या सत्रात जल दिनानिमित्य सर्व स्वयंसेवकांना पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले.पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण पाण्याचा काटकसर वापर याबद्दल माहिती देण्यात आली व जल संरक्षण व पाण्याचा काटकसर वापर याबद्दल प्रतिज्ञा देण्यात आली.
या सत्रामध्ये कोविड लसीकरणाचे महत्व व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर परीसवादाचे आयोजन करण्यात आले या परिसंवादाचे मार्गदर्शक मा. डॉ. विनोद मडावी तालुका वैद्यकीय अधिकारी नागभीड़ होते. तर परिसंवादाचे अध्यक्ष प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. डी. देशमुख होते.
डॉ. जी डी. देशमुख यांनी, ‘ पर्यावरण जनजागृती सोबतच निसर्गाचे नियम कसे असतात व निसर्ग आपला मित्र कसा आहे’ हे पटवून दिले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रचल ढोक यांनी केले तर आभार प्रा. किशोर बोरकर यांनी मानले. रा.से.यो. स्वयंसेवक, ग्रामावासीय यांची उपस्थिती होती.