तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्शांचे पालन व प्रसार करावा

62

न्यु तापडीया नगर शिवजयंती समारोहात सौरभ वाघुडे यांचे प्रतिपादन

मीडिया वार्ता न्युज
२४ मार्च,अकोला: समाजातील तरुणांनी शिवरायांचे विचार आत्मसात करून त्यांच्या विचार आणि कर्तृत्वाच्या आदर्शांची समाजात प्रसार करावा, असे प्रतिपादन शिवश्री सौरभ वाघुडे यांनी न्यु तापडीया नगरातील शिवजयंती समारोहात बोलताना केले. न्यू तापडीया नगरातील गणपती मंदिरासमोर शिवराजे शिवभक्त मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एलआरटी महाविद्यालयाचे डॉ. अनिल तिरकर तर प्रमुख अतिथी म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख व छत्रपती सेनेचे संस्थापक-अध्यक्ष करण शाहू होते. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना दिप प्रज्वलन, पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सौरभ वाघुडे यांनी अभ्यासपूर्ण वक्तृत्वातून आवेशपूर्ण आवाहनाने समाजातील तरुणांना क्षणभंगुर मृगजळांना टाळून संघटीत शक्तीतून विधायकतेने निरोगी समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची अपेक्षा प्रतिपादीत केली. 

 

हे आपण वाचलंत का?

 

नेहमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍या शिवराजे शिवभक्त मंडळाच्या उत्साही तरुणांनी ठेवलेल्या या कार्यक्रमात बहूसंख्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक राशलवार, डॉ. निरज शुक्ला, ऋषिकेश राऊत, ऋषीकेश पटेल, रितेश देशमुख, रोहन आहाळे, यश राशलवार, अभिषेक पत्की, केतन मिश्रा, शुभम चोपडे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन रोहन आहाळे तर आभार प्रदर्शन अभिषेक पत्की यांनी केले.

https://www.instagram.com/p/CbGE28qtDCl/