अम्मा का टिफिन उपक्रम हे मानवी सेवेचे उत्तम उदाहरण – अभिनेता आकाश ठोसर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या टिमसह दिली अम्मा का टिफीन उपक्रमाला भेट

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

 मो: 8830857351

चंद्रपूर, 24 मार्च:  चंद्रपूरात प्रथमच आलो. येथील नागरिकांनी भरभरुन प्रेम दिले. यावेळी अम्माचा टिफिन या उपक्रमाला भेट दिली. एक मोठे सामाजिक कार्य, अम्मा का टिफिन या उपक्रमाच्या माध्यमातून सुरु असुन हा उपक्रम मानवी सेवेचे उत्तम उदाहरण असल्याचे सैराट, झुंड फेम सिनेअभिनेता आकाश ठोसर यांनी म्हटले आहे.

एका मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर आज चंद्रपूरात होते. दरम्यान त्यांनी आ. किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी येत अम्मा का टिफिन या उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी अम्माचीही भेट घेत सर्व माहिती जाणुन घेतली यावेळी अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेत्री सायली पाटील यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी आ. जोरगेवार यांनी संपुर्ण टिमचे शाल, श्रीफळ, संविधान पुस्तक आणि माता महाकालीची मुर्ती देत स्वागत केले.

या प्रसंगी गंगुबाई ऊर्फ अम्मा जोरगेवार, माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, कॉंग्रेस सेवा दलाचे सूर्यकांत खनके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. आ. जोरगेवार यांच्या वतीने अम्माचा टिफिन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत गरजूंना घरपोच जेवणाचा टिफिन पोहचविल्या जात आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौक केल्या जात आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम अम्मा आणि आ. जोरगेवार यांच्या वतीने स्वखर्चाने राबविण्यात येत आहे.

दरम्यान आज शुक्रवारी सैराट या सुप्रसिध्द सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि या सिनेमात काम केलेले अभिनेता आकाश ठोसर यांनी या उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपक्रमाची संपूर्ण माहिती जाणुन घेत अम्माचा टिफिन उपक्रमातील कर्मचारी सहकारी यांचीही भेट घेतली. याप्रसंगी नागराज मंजुळे यांनी अम्माशी मनखुलास गप्पा मारत त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती घेतली.

यापुर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंतांनी अम्मा का टिफिन या उप्रकमाला भेट दिली आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here