शालेय बसच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ विद्याथ्याची शाळेची बसची वाट ही महागली

✍️सचिन पवार ✍️

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

माणगांव :-राज्यातील स्कूलबस ओनर्स असोसिएशने नव्या शैक्षनिक वर्षासाठी स्कूलबसच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज जाहीर केला त्यामुळे आधीच शाळाच्या शुल्कवाढीने हैराण झालेल्या राज्यातील कोट्यावधी पालकांना आता नवीन शैक्षनिक वर्षात स्कूलबसमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

केंद्र सरकारने स्क्रॅप, एन युरो, एन आर ई धोरण आणल्यामुळे बस उत्पादन कंपनीने दिड ते दोन लाखाची वाढ केली आहे. त्यामुळे नवीन बसचे दर २८ लाख तर मिनी बसची किंमत २१ लाख इतकी झाली आहे. तसेच सर्व स्पेअर पार्ट्स टायर बॅटरी याचे दर १२ ते १८ टक्यापर्यत वाढले आहेत. स्कूल बसवरील कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य खर्चही आहेत. या पाश्वभूमीवर दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

कोरोना साथीने स्कूलबस जागेवर उभ्या होत्या तेव्हा मोठे नुकसान झालं अश्यातच बसचालक आणि वाहक यांच्या वेतनातही वाढ झाली आहे. हा सर्व खर्च ध्यानात घेता स्कूल बसच्या दरात १५ ते २० टक्यानी वाढ करण्याच निर्णय सर्व स्कूल बसच्या असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here