प्रदूषणाने घेरलेली आपली पृथ्वी...

प्रफुल मदनकार

मो: 7972220490

पृथ्वीवर मानव किती प्रकारचे प्रदूषण मोठ्या प्रमाणत करीत आहेत याचे उदाहरण मागील अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ यांनी करून दिले आहे.ज्या पंचमहाभुतांनी(आकाश,वायू,भूमी, अग्नी, जल)पासून या निसर्गाची निर्मिती झाली आहे.ज्याला आपण जीवन असे म्हणतो.त्यात असंख्य प्रमाणात या मानव जातीने ‘ कचऱ्याचे साम्राज्य’ तयार करून ठेवले आहे.या पंचमहाभुतांना प्रदूषित करण्याचे काम तो करीत आहे.यामुळे या पृथ्वीवर जवळपास २१२ करोड टन ‘घन कचऱ्याची ‘ निर्मिती झाली आहे.तसेच दररोज १.५ लाख टन कचरा विविध माध्यमातून तयार होतो आहे.

यात कंपनीतील कचरा,शेतातील कचरा, प्लास्टिक, समुद्रातील कचरा,वातावरणातील कचरा असा ५०% विघटन होणारा व ३०%विघटन न होणारा कचऱ्याचा समावेश आहे. तसेच जमिनीतील कोळसा काढल्यानंतर १ टन कोळसा पासून जवळपास ४०० किलो (राख) तयार होत आहे.देशातील एकूण ७०% कोळशाची गरज लक्षात घेता दिवसाला ८.५ लाख टन कचरा हा कोळसापासून तयार होतो आहे.पर्यावरण अगदी उध्वस्त करून टाकले आहे.

यात सर्वात हानिकारक म्हणजे ‘जीवाश्म इंधन’ पेट्रोकेमिकल वस्तू,उत्पादने व इतर आहे.गरज आहे निसर्गाला जपण्याची,त्याचे संवर्धन व संरक्षण करण्याची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here