“नाईक-अंतुले महाविद्यालयात मतदान जन जागृती रॅली सह कार्यक्रम संपन्न”.- “लोकसभा सार्वत्रिक निवणूक २०२४ साठी शासन राज्ज, ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती व प्रात्यक्षिके ईव्हिएम- व्हिव्हिपॅटचे काम पारदर्शक”.—

"नाईक-अंतुले महाविद्यालयात मतदान जन जागृती रॅली सह कार्यक्रम संपन्न".- "लोकसभा सार्वत्रिक निवणूक २०२४ साठी शासन राज्ज, ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती व प्रात्यक्षिके ईव्हिएम- व्हिव्हिपॅटचे काम पारदर्शक".---

नाईक-अंतुले महाविद्यालयात मतदान जन जागृती रॅली सह कार्यक्रम संपन्न”.-

“लोकसभा सार्वत्रिक निवणूक २०२४ साठी शासन राज्ज,

ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती व प्रात्यक्षिके

ईव्हिएम- व्हिव्हिपॅटचे काम पारदर्शक”.—

"नाईक-अंतुले महाविद्यालयात मतदान जन जागृती रॅली सह कार्यक्रम संपन्न".- "लोकसभा सार्वत्रिक निवणूक २०२४ साठी शासन राज्ज, ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती व प्रात्यक्षिके ईव्हिएम- व्हिव्हिपॅटचे काम पारदर्शक".---
✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :-  “मतदान करणे हा तर हक्कच असल्याचे तहसीलदार समीर घरे यांच्याकडून सांगण्यात आले.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवणूक २०२४ ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती होण्यासाठी प्रशिक्षण, प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीचा कार्यक्रम आज व्ही. एन. सी. कॉलेज, अंजुमन हायस्कूल येथे प्रांत डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती व प्रात्यक्षिके कार्यक्रम झाला.यामुळे ईव्हिएम- व्हिव्हिपॅटचा प्रसार होतानाच अतीशय चांगल्या पध्दतीने जनजागृती झाल्याचे उपस्थितानी सांगितले. ईव्हिएम- व्हिव्हिपॅटचे मतदार नागरिकांची नोंदवही, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी , WPATs चिठ्ठयांची मोजणी ही सर्व प्रात्यक्षिके व नागरिकांचे शंका दूर करण्यात आली. लोकशाही प्रधान भारत देशात आपल्या हक्काचे सरकार निवडुन आणण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे तसे होण्यासाठी शासनाचे वतीने मतदारांना होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे त्या नुसार म्हसळा शहरात मतदारांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिनांक ०७ मे,२०२४ रोजी मतदान करण्याचा हक्क असलेल्या सर्वांनीच मतदान करून आपल्या हक्काचे सरकार निवडावे या साठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग यांचे आदेशान्वये जनजागृती करण्यात येत आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी समजून त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचेही आवाहन समीर घारे यांनी केले. यावेळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे १८ वर्षे पूर्ण असल्याने नमुना नं.६ चे फॉर्म भरुन घेणेत आले. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना माहिती देवून फॉर्मचे वाटप करण्यात आले.

भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांनी फक्त मतदार म्हणून नोंदणी न करता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत भाग घेऊन योग्य उमेदवाराला मतदान केले पाहिजे असे कार्यक्रम दरम्यान सूचित करण्यात आले.याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. महेश पाटील, तहसीलदार समीर घारे,नायब निवासी तहसीलदार गणेश तेलंगे, महसूल तहसीलदार धर्मराज पाटील, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,निवडणूक नायब तहसीलदार संध्या अंबुर्ले,व्ही. एन. सी. प्राचार्य दिगम्बर टेकळे,मंडळ अधिकारी सलीम शहा, म्हसळा तलाठी गोरख माने आदि मान्यवर उपस्थित होते.

चौकट:-

लोकसभा सार्वत्रिक निवणूकी मध्ये नव्याने वापरण्यात येणाऱ्या ” ईव्हिएम- व्हिव्हिपॅट ” मशिनचे आज झालेले प्रात्यक्षिक प्रत्यक्ष वापर , समज- गैरसमज पूर्ण पणे दूर झाले, आम्ही EVM ने केलेले मतदान WPATs मध्ये नोंदले गेल्याची आम्ही खात्री केली.- साक्षी सुनिल आंजर्लेकर (विद्यार्थिनी )

चौकट:-

ईव्हिएम- व्हिव्हिपॅट मशिनचे आज झालेले प्रात्यक्षिक अतिशय चांगले झाले. EVM बाबत असणाऱ्या चर्चा व अन्य गोष्टी या अफवाच आसल्याचे त्यामुळे लक्षांत आले. ईव्हिएम- व्हिव्हिपॅट चे काम पारदर्शक आसल्याची खात्री झाली.-शिवानी वर्मा(विद्यार्थिनी )
म्हसळा येथील व्ही. एन. सी. महाविद्यालयात मतदान जनजागृती रॅलीत सहभागी तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड आणि मान्यवर उपस्थित होते.