म्हसळा येथे युवासेना आढावा बैठक संपन्न.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संघटना बांधण्यासाठी युवासेनेचा सिंहाचा वाटा असेल.. तालुका अधिकारी कौस्तुभ करडे.
✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: म्हसळा तालुक्याची युवासेनेची आढावा बैठक म्हसळा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक दक्षिण रायगड युवासेना जिल्हाधिकारी चेतन पोटफोडे व अमित महामुणकर प्रमुख उपस्थित राहुन सर्व युवासैनिकांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत व संघटना बांधणीबाबत सूचक मार्गदर्शन केले. यावेळी युवासेना म्हसळा शहरातील काही प्रमुख पदाधिकारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली. जैद वस्ता व स्वानंद बोरकर यांची युवासेना उप शहर अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली,तसेच तन्वीर हवा, नबील कर्देकर, सुफियान चौगुले, अकलाख काद्री यांची प्रभाग शाखा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. येणाऱ्या काळात युवासेना लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत व संघटना बांधणीमध्ये सिंहाचा वाटा उचलेल व विजयाच्या वाटचालीत असलेली रायगड लोकसभा निवडणूकमध्ये म्हसळा तालुक्यात युवासेनेचे मतदान मोठ्या मताधिक्याने असेल असा विश्वास म्हसळा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांनी वर्तविला. येणारी प्रत्येक निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही असेल असे सुद्धा सूचक विधान देखील तालुका अधिकारी यांनी केले, म्हसळा युवासेना ही सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते व युवासेना संघटना अजुन बळकट करून मतदानाच्या वेळी युवासेनेची खरी ताकद दिसेल असे देखील करडे यांनी नमूद केले आहे. या आढावा बैठकीत उपस्थित प्रमुख मार्गदर्शक दक्षिण रायगड युवासेना जिल्हा अधिकारी चेतन पोटफोडे,अमित महामुणकर, रायगड जिल्हा सोशल मीडिया समन्वयक प्रणय साळवी,युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, शहरप्रमुख विशाल सायकर,युवासेना तालुका चिटणीस. राहूल जैन, उपशहर प्रमुख,दिपल शिर्के, उपशहर प्रमुख नौमान वसगरे, शिववाहतूक सेना तालुका अध्यक्ष सुजित येलवे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास खेडेकर,तसेच तालुक्यातील युवासेना ,शिवसेना, वाहतूकसेना यांचे पदाधिकारी व शिवसैनिक, युवसैनिक उपस्थित होते.
———————————-
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन नियुक्त्या अतिशय महत्त्वपुर्ण असणार असे जाणकारांचे म्हणणे आहे.
———————————–
रायगड लोकसभा निवडणुक ही आमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकीत युवासेनेचा सिंहाचा वाटा असणार आहे व जिल्ह्यात युवासेना मोठ्या मताधिक्याने मतदान करणार , युवासेना आता तालुक्यात बळकट होत चालली आहे व निवडणुकीत युवासेनेची खरी ताकद दिसेल.
कौस्तुभ करडे.
युवासेना तालुका अधिकारी.