डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की नागपूर मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.२४) राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्षयरोग विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ राधा मुंजे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, सहयोगी प्राध्यापक डॉ. ग्यानशंकर मिश्रा (मेयो), डॉ. अर्चना खाडे व मनपाचे सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, टी.बी. समन्वयक उपस्थित होते.