लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकुण रूपये ८२,९५,३४१/- ची वसुली
किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ८२ प्रकरणे गुन्हा कबूली व्दारे निकाली निघाली
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांचे आदेशान्वये व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानसुार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात २२ मार्च रोजी या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेशाबाबतची कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे असे न्यायालयात प्रलंबीत दावे व दाखलपुर्व वाद प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे, पतसंस्था व बँकाची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकीत कर्ज प्रकरणे, ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे, घरकुल अनुदान वसुली प्रकरणे तसेच ग्राहक न्यायालयातील प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे ठेवण्यात आली होती. सर्व जिल्हयात मिळून एकुण १० पॅनल ठेवण्यात आले होते. या पॅनल समोर सर्व प्रकारची मिळून एकुण २३१ प्रलंबित आणि ३४७ दाखलपुर्व खटले आपसात तडजोडीने निकाली निघाले. या लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकुण रूपये ८२,९५,३४१/- ची वसुली झाली. किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ८२ प्रकरणे गुन्हा कबूली व्दारे निकाली निघाली.
पॅनल क्रमांक २ वर आपसी समझौता करीता असलेल्या वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती-पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक रा. जोशी यांनी समस्त न्यायाधीश वृंद यांचे उपस्थितीत उभयतांचा साडी-चोळी व शेला देवून सत्कार केला. विनायक रा. जोशी व आर. आर. पाटील यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश पी. आर. सित्रे, यांनी पॅनल क. ०१ वर काम पाहीले, पॅनल क्र. ०२ वर दिवाणी न्यायाधिश (व. स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी एस.पी. सदाफळे, पॅनल क्र. ०३ वर सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) सी. पी. रघुवंशी यांनी काम पाहिले.
२२/०३/२०२५ रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषीत करुन किरकोळ गुन्हयाचे खटले फौ. प्र.सं. कलम २५६, २५८ अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता तृतिय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) श्रीमती एन. ए. पठान यांचे न्यायालय कार्यरत होते. तसेच पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वयंसेविका अनधा पाध्ये, पॅनल क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वयंसेवक अखील शेख, पॅनल क्रमांक ०३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वयंसेवक राहूल बारसागडे यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर आखाडे, आणि जेष्ठ अधिवक्ता वृंद तसेच समस्त अधिवक्ता वृंद, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.