नागपूरात रेमडेसिविरचा काळाबाजार; पाच नराधम गजाआड.
नागपूरात रेमडेसिविरचा काळाबाजार; पाच नराधम गजाआड.
नागपूरात रेमडेसिविरचा काळाबाजार; पाच नराधम गजाआड.
नागपूरात रेमडेसिविरचा काळाबाजार; पाच नराधम गजाआड.
नागपूरात रेमडेसिविरचा काळाबाजार; पाच नराधम गजाआड.
️युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी️
नागपूर,दि.23 एप्रिल:- उपराजधानीत कोरोना वायरसने हाहाकार माजवला आहे. रोज हजारो कोरोना वायरस बाधीत रुग्ण समोर येत आहे. तर दुसरीकडे शेकडो कोरोना वायरस बाधीत रुग्ण मयत होत असल्याचे समोर येत आहे. पण अशा या महामारीच्या काळात काही समाजद्रोही नराधम काळाबाजार करुन रुग्णांच्या टाळूवरील लोणी खाण्यात मस्त असल्याचे अनेक घटना वरुन समोर येत आहे.
नागपुर पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्या पाच नराधमांना बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सात इंजेक्शन आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यात एका नगरसेवकाच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
मनोज वामनराव कामडे वय 40 वर्ष, रा. जुनी शुक्रवारी, अतुल भीमराव वाळके वय 36 वर्ष, रा. आयुर्वेदीक लेआऊट, पृथ्वीराज देवेंद्र मोहिते वय 36 वर्ष, रा. रहाटे कालोनी, अनिल वल्लभदास ककाणे वय 52 वर्ष, रा. टेलिफोन एक्सचेंज चौक आणि अश्विन देवेंद्र शर्मा वय 32 वर्ष, रा. गावंडे लेआउट, नरेंद्रनगर अशी या नराधमांची नावे असून, मनोज कामडे आणि अतुल वाळके या टोळीचे सूत्रधार असल्याचे समजते.
आरोपी वाळके आणि कामडे यांच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शन असून ते त्याची ब्लॅकमार्केटिंग करीत असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना कळली. त्यानुसार, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी कारवाईचा सापळा रचला. त्यानुसार, आरोपी कामडेवर पोलिसांनी नजर रोखली. सायंकाळी तो वर्धा मार्गावर रेमडेसिविर घेऊन आला. तो एका ग्राहकाला ती विकणार होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या गाडीची डिक्की तपासली असता त्यात तीन रेमडेसिविर सापडले. नातेवाईक भरती असल्यामुळे त्याला ते देत असल्याचे कामडेने सांगितले. कोणता नातेवाईक, कुठे आहे, या प्रश्नावर त्याने थाप मारली. पोलिसांनी संबंधित रूग्णालयात चौकशी केली असता कामडे खोट बोलत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखविला. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. तेथेही दोन इंजेक्शन सापडले. नंतर कामडेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल वाळकेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन रेमडेसिविर सापडले. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी मोहिते, ककाणे आणि शर्मा या तिघांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here