हिंगणघाट शहरातील मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करा
हिंगणघाट शहरातील मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करा

हिंगणघाट शहरातील मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करा; सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

हिंगणघाट शहरातील मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करा
हिंगणघाट शहरातील मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करा

मुकेश चौधरी विद ब्युरो चिप✒
हिंगणघाट:- शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.हिंगणघाट शहर हे उद्यौगिक शहर म्हणून आळखले जाते त्याच बरोबर या शहराची बाजारपेठ सुध्दा मोठी आहे. हिंगणघाट शहरात मोठी सुतगीरणी व मिल असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मिल मजदुर वर्ग राहतो. या मध्ये महिला, पुरूष व युवा प्रवर्गातील मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

हिंगणघाट शहरातील मोठ्या सुतगीरणी व मिल सुरू असल्यामुळे मजदुर वर्गाला कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा आधिक धोका आहे. त्यामुळे मिल मालकांकडून मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांनी जिल्हाधीकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदनातून केली आहे.

वास्तविक पाहता आपल्या संपुर्ण हिंगणघाट तालुक्यासह जिल्हाची परीस्थीती अतिशय चिंताजनक आहे.दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रूग्णलयातील ताण सुध्दा वाढत आहे. प्राणवायु व व्हेंटिलेटर अभावी रूग्णांचे हाल होत असून अनेकांचा मृत्यु झाला आहे. व शहरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जेणेकरून सामान्य घरून आलेल्या मिल मजदुराला कोरोना विषाणुचा संसर्ग होणार नाही आणी मानसिक दुष्ट्या खचलेल्या मजदुर वर्गावर आर्थिक बोझा वाढणार नाही व त्याच्या कुटुंबाची गय होणार नाही. या संपुर्ण परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेता ताबडतोब निर्णय घेवून शहरातील मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करण्यात यावे असे मत सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांनी दिलेल्या सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना व्हाट्सएपच्या मदतीने पाठवलेल्या निवेदनातून व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here