रुग्णालयांनी योग्य रेफरल पद्धतीनुसारच कोविड रुग्णांना दाखल करावे: वर्धा जिल्हाधिकारी
रुग्णालयांनी योग्य रेफरल पद्धतीनुसारच कोविड रुग्णांना दाखल करावे: वर्धा जिल्हाधिकारी

रुग्णालयांनी योग्य रेफरल पद्धतीनुसारच कोविड रुग्णांना दाखल करावे: वर्धा जिल्हाधिकारी

️अति गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध राहावे म्हणून घेतला कठोर निर्णय: जिल्हाधिकारी

रुग्णालयांनी योग्य रेफरल पद्धतीनुसारच कोविड रुग्णांना दाखल करावे: वर्धा जिल्हाधिकारी
रुग्णालयांनी योग्य रेफरल पद्धतीनुसारच कोविड रुग्णांना दाखल करावे: वर्धा जिल्हाधिकारी

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा,दि.24:- कोविड पॉझीटीव रूग्णांकरीता वर्धा जिल्हयात सुमारे एक हजार बेड उपलब्ध  आहेत. मात्र सेवाग्राम आणि सावंगी या  दोनही रूग्णालयात सौम्य लक्षणे असलेले बरेच रूग्ण दाखल होत असल्याने मध्यम किंवा तिव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रूग्णांना उपचारार्थ बेड उपलब्ध होणे कठीण होत आहे. अशावेळी गंभीर परिस्थितीतील रुग्णांना बेड साठी ताटकळत राहावे लागू नये म्हणून  जिल्हा सामान्य रूग्णालय, वर्धा, उपजिल्हा रूग्णालय,आर्वी व हिंगणघाट तसेच जिल्हयातील ग्रामीण रूग्णालय येथील  डॉक्टरांनी रेफर केल्याशिवाय कोणत्याही कोविड पॉझीटीव रूग्णांस कोविड रूग्णालयात दाखल करण्यात येवू नये असा  निर्णय जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

सेवाग्राम हॉस्पीटल व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय, सावंगी (मेघे) येथे सध्या गंभीर रूग्णांसाठी बेड उपलब्ध नाही अशी  परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गंभीर रुग्णास बेड अभावी वेळीच औषधोपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडत आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील बेडचे काटेकोर व्यवस्थापन करण्यासाठी आणि रुग्णांच्या लक्षणानुसार त्यांना योग्य त्या रुग्णालयात बेड व उपचार मिळण्यासाठी प्रत्येक कोविड पॉझीटीव रूग्णास रेफर करण्यापूर्वी  शासनाच्या निर्देशानुसार तयार केलेल्या ‘ रेफरल प्रोटोकॉल’ चे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले. यापुढे जिल्हा रूग्णालय, वर्धा, उपजिल्हा रूग्णालय, आर्वी / हिंगणघाट तसेच जिल्हयातील ग्रामीण रूग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांशी संबधित सर्व माहिती रेफरल फॉर्म मध्ये भरून सदर रूग्णाबाबत नियमानुसार निर्णय घेवून रूग्णास रेफर करावे.

  रूग्णास रेफर करण्यापूर्वी संबधित रूग्णालयात बेड उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच रूग्णांस रेफर करावे. बेड उपलब्ध असल्याची खात्री न करता कोणत्याही परिस्थितीत पेशंटला संबधित रूग्णालयात अथवा कोविड केअर सेंटरला रेफर करण्यात येऊ नये. रुग्णास  मनस्ताप किंवा त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधित रुग्णालयांनी घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सदर कार्यपध्दतीनूसारच रूग्णाच्या उपचार पध्दतीबाबत निर्णय घ्यावा.  संबधित रुग्णालयांनी  देखील योग्य पद्धतीने  रेफर केलेल्या रूग्णांनाच यापुढे इस्पीतळात प्रवेश देण्याची कार्यवाही करावी. सदर प्रक्रियेचे सर्व संबधितांनी काटेकोरपणे पालन न केल्यास व निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबधितांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत

रुग्णालयातील संपर्क क्रमांक आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय  सावंगी मेघे  दुरध्वनी क्रमांक  07152 287722, 7350066930, नोडल अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे 9067390749 व 9579276769, महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्था, सेवाग्राम दुरध्वनी क्रमांक 07152 284249 दुरध्वनी क्रमांकावर, सामान्य रुग्णालय दुरध्वनी क्रमांक 07152 243066, 243895 विस्तार क्रमांक 111 नोडल अधिकारी डॉ. अनिल वानखेडे  7350679075, 9112302950 व डॉ. गोपाल लांडगे 7720044211, डॉ. चाचरकर उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट 8830458429, आर्वी  डॉ. सुटे 8788216380, 9422844729, डॉ. चंद्रशेखर पाटील ग्रामीण रुगणालय वडनेर 9422542984,देवळी डॉ. आशिष लांडे 9850366462, भिडी डॉ. दिनेश राठोड 9850313184,पुलगाव डॉ. गोपाल नारलवार 9890501630, 8605870071,आष्टी डॉ. महम्मद शेख 9545430694 डॉ. पराडकर 8999386883, कारंजा  डॉ. वंजारी 7798172959, 8421229225, सेलू डॉ. पल्लवी वांदिले 9665077355, 8208111352, समुद्रपूर डॉ. म्हैसकर यांच्या 9860051432 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा शल्य चिकित्सक  यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here