खेळ मक्ता येथे दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धाड; दारू विक्रेत्याकडून 2 लाख 15 हजार 690 रुपये रोख हस्तगत.

अमोल माकोडे ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रह्मपुरी:- तालुक्यात कोरोणाच्या महामारीने जनता हैराण झाली सर्वत्र लौकडाऊन व जनता कर्फ्यू लावण्यात आले आहेत. त्यातच शासकीय व प्रशासकीय यंत्रनेसह पोलीस विभाग सुद्धा कामाला लागले असून आपले कार्य बजावण्यात तत्पर आहेत. ह्याचाच फायदा घेत बंदी मध्ये दारू विक्रेत्ये अवैध रित्या मोठ्या प्रमाणात पैशाच्या हव्यासापोटी वाजवीपेक्षा जास्त दरात दारू विक्री करत आहेत. मात्र त्यातच मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन  कोरोना महामारी गावखेड्यात वाढत आहे. शिवाय दारू पिणारे व्यक्ती कडून सामान्य नागरिकांना याचा त्रास होत असल्याने खेड मत्ता गावातील लीला निकुरे, उषा मेश्राम, कल्‍पनाबाई, साधना देशमुख, कुसुम भोयर या महिलांनी पुढाकार घेऊन खेड मक्ता येथील वार्ड क्रमांक 1 मध्ये चार-पाच व्यक्ती मोह फुलाची दारू काढून विक्री करणाऱ्यां व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन खेड गावात संपूर्ण दारूबंदी झालीच पाहिजे यासाठी थेट ग्रामपंचायत घाठून सरपंच व गावातील पोलीस पाटील यांना सूचना केल्या.

समोर कोरोणाचा प्रादूर्भाव गावात वाढू नये आणि सर्वस्व प्रशासनानी आपल्यावर दिलेली जबाबदारी लक्षात घेत सरपंच ज्योती सचिन मेश्राम व पोलीस पाटील देवानंद सोनकुसरे यांनी खेड मध्ये होणाऱ्या अवैद्य दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीबाबत ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनला माहिती दिली  वेळीच सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मल्लिका अर्जुन इंगळे यांनी खेड मक्ता विभागाचे बीटजमादार गौरकर यांना सूचना देऊन खेड  गावातील अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यामध्ये संदीप हिरामण गुरुपुढे या दारू विक्रेत्यावर कारवाई करून त्यांच्याकडून 2 लाख 15 हजार 690 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून त्यांच्या घरामागील परिसरात फ्लॅटमध्ये असलेला मोह फुलाचा दारूसाठा जप्त करण्यात आला याव्यतिरिक्त सूर्यभान मन्साराम नागापुरे संदीप मनोहर नागापुरे सचिन दिलीप डांगे ह्या  व्यक्तीकडून 2,15,690 रुपये रोख जप्त करण्यात आला असून सदर देशी दारू विक्रेत्यावर कलम 65( फ) नी मूदामा 65(इ) अन्वये ब्रह्मपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व अटक करून सुटका केली. यासाठी खेड गावातील सरपंच ज्योती मेश्राम पोलीस पाटील देवानंद सोनकुसरे यांच्यासह पुरुष व महिला मंडळींनीही मोलाचे सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here