उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मारला अवैध दारूविक्रेत्यावर छापा, 75 हजार 730 रुपयाचा माल जप्त.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मारला अवैध दारूविक्रेत्यावर छापा, 75 हजार 730 रुपयाचा माल जप्त.

उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मारला अवैध दारू विक्रेत्यावर छापा, 75 हजार 730 रुपयाचा माल जप्त.

उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मारला अवैध दारूविक्रेत्यावर छापा, 75 हजार 730 रुपयाचा माल जप्त.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मारला अवैध दारूविक्रेत्यावर छापा

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
कारंजा (घा):- संचारबंदी सुरू असताना अवैधरित्या दारू विक्री करणार्‍या दारु अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके यांनी छापा मारला. यात 75 हजार 730 रुपयाचा देशी, विदेशी कंपनीचा माल जप्त करण्यात आला. दारु विक्रता धनराज कळंबे (66) याला अटक करण्यात आली. ही कारवाई गोळीबार चौक येथे करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गोळीबार चौकात अवैधरित्या दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे धनराज कळंबे याच्या घराची झडती घेतली असता, पलंगाखाली देशी दारूने भरलेल्या तिन खरड्याचे खोक्यात सेवन स्टार कंपनीच्या 155 शिश्या, ह्यावर्ड्स- 500 कंपनीच्या 25 टिन, एका खरड्याचे खोक्यात 90 एम. एल. ऑफीसर ब्ल्यू कंपनीच्या 110 शिश्या व खुल्या विक्रीकरिता 95 एम.एल. ऑफीसर ब्ल्यू कंपनीच्या 89, एका खरड्याचे खोक्यात 180 एम.एल मॅकडॉल कंपनीच्या 50 शिश्या व चिल्लर विक्री करीता 180 एम.एल च्या सेवन स्टार कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 100 शिश्या असा 75 हजार 850 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देशी, विदेशी दारूची अवैध विक्री करणार्‍या धनराज कळंबेला अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनात मारोती सिडाम, प्रविण देशमुख, स्वप्नील वाटकर, देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here