खांब तळोधी! शून्य लोकसंख्येचे गाव शासनाला प्राप्त होतो महसूल..

खांब तळोधी! शून्य लोकसंख्येचे गाव शासनाला प्राप्त होतो महसूल..

खांब तळोधी! शून्य लोकसंख्येचे गाव शासनाला प्राप्त होतो महसूल..

अमोल माकोडे ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रह्मपुरी:- अनेक कुटुंबाच्या वास्तव स्थळाला गाव म्हटलं जाते गाव म्हटलं की लोकसंख्या आहेच पण ब्रह्मपुरी तालुक्यात असे ही एक गाव आहे की त्या गावाची लोकसंख्या मात्र शून्य आहे अजिबात विश्वास वाटत नसेल तरीसुद्धा अगदी खरं आहे आणि अशा या शून्य लोकसंख्या असलेल्या गावाचे नाव आहे खांब तळोधी!

ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले)  कोथुळणा गावालगत व सोंद्री यांच्या मधोमध गाव असून जवळपास हा परिसर अडीच एकर जागेमध्ये वसलेला आहे त्या ठिकाणी एक पुराने मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आला आहे. पिंपळाचे रुक्ष व वळाचावृक्षासह  इतरही वृक्ष सुद्धा आजही या गावाचे साक्षीदार म्हणून उभी आहेत एक पुरानी दगडाने बांधलेली विहीर व छोटीशी गुरा ढोरांना पाणी पिण्यासाठी बोळी अस्तित्वात असल्याचे संकेत आहेत पूर्वीच्या काळी म्हणजे पाच -सहा दशका अगोदर हे गाव अस्तित्वात होते विशेष म्हणजे या गावाच्या नावाने शासनाला महसूल 

ही प्राप्त होत असून शासन दरबारी आजही खांब तळोधी गावाच्या नांवाच्या उल्लेखाने साजा 08 क्रमांकासह शेतकरी शेतसारा सुद्धा भरत होते आगोदर येथे लोकवस्ती होती मात्र या गावात महाभयंकर महामारी आल्याचे ऐकिवात आहे त्यावेळी प्लेगची साथीने या गावात मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याने येथील लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत होते त्या काळात उपचाराची पाहिजे तेवढी सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे जडीबुटीचे घरगुती उपचार करून आपले कसेबसे जीवन ते जगत होते तरीपण मृत्यूचे प्रमाण आणखी दिवसागणिक वाढत गेल्याने या गावातील लोकांनी खांब तळोधी गाव सोडून आजूबाजूच्या गावात आसरा घेत जिथे आपली व्यवस्था योग्य होईल अशा गावां मध्ये वास्तव्यास राहण्यासाठी पसंती दाखवली व ज्यांना शेत जमीन मुळातच नव्हती अशा लोकांनी बाहेरगावी वास्तव्यास जाऊन स्थायिक झाले

आजही शासनाच्या महसूल विभागात आपल्या शेतीचा शेतसारा शेतकऱ्यांना खांब तळोधी गावाच्या नावाने तहसील कार्यालयाकडून काही दिवसाअगोदरमिळत असल्याचे सांगण्यात येते मात्र आता झुडपी जंगल या नावाने मिळत असल्याची माहिती आहे तर काही शेतकऱ्यांना राजे रघुजी नावाने नोंद असलेले सातबारे मिळत असल्याची माहिती आहे आजही या गावाचे अवशेष सदर ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते एवढे मात्र निश्चित!

सदर जागेवर अतिक्रमणाचा विळखा:

तहसील कार्यालय ब्रह्मपुरी अंतर्गत मंडळ विभाग अरेर- नवरगाव  खांब तळोधी साजा क्रमांक 08 पिंपळगाव भोसले अशा नावाने अगोदर सातबारा शेतकऱ्यांना मिळत होता आता मात्र काही दिवसापासून सरकारी झुडपी जंगल या नावाने सातबारा निघत असल्याची माहिती आहे शिवाय (1 हेक्टर 38 आर  अंदाजे जवळपास अडीच एकर जागेमध्ये खांब तळोधी गावाचा परिसर वसलेला होता) तिथे गुराढोरांना व  इतरांनाही पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून एक छोटीशी तळा बोळी खोदण्यात आली होती मात्र बोळी परिसरासह गाव वस्ती असलेल्या खांब तळोधी गावाची अडीच एकरही जमीन निकामी झाल्याने त्या जागेवर आजू बाजूच्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात अतिक्रमण करून जमीन हडपण्याचा प्रयत्न चालविला असल्याची  माहिती आहे मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात  नसल्याचा आरोपही( पिंपळगाव भो)येथील  गावकऱ्यां कडून केला जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here